शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदी जगताप, उपमहापौर अलगुडे

By admin | Updated: February 26, 2016 04:30 IST

पुण्याच्या महापौरपदी प्रशांत जगताप यांची, तर उपमहापौरपदी मुकारी अलगुडे यांची निवड झाली. काँग्रेस व राष्ट्रवादीने संयुक्तपणे निवडणूक लढवली, तर सेना-भाजपने दोन्ही पदांसाठी स्वतंत्र

पुणे : पुण्याच्या महापौरपदी प्रशांत जगताप यांची, तर उपमहापौरपदी मुकारी अलगुडे यांची निवड झाली. काँग्रेस व राष्ट्रवादीने संयुक्तपणे निवडणूक लढवली, तर सेना-भाजपने दोन्ही पदांसाठी स्वतंत्र उमेदवार देऊन युतीतील फूट सिद्ध केली. मनसेने तटस्थ धोरण स्वीकारले. राष्ट्रवादीचे जगताप यांना ८४ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे अशोक येनपुरे यांना २५, तर शिवसेनेचे सचिन भगत यांना १२ मते मिळाली. उपमहापौर अलगुडे यांना ८४ मते मिळाली. भाजपच्या वर्षा तापकीर यांना २५ व सेनेच्या योगेश मोकाटे यांना १२ मते मिळाली.पिठासीन अधिकारी म्हणून पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी कामकाज सुरू केले. नगरसचिव सुनील पारखी यांनी त्यांना साह्य केले. मावळते महापौर दत्तात्रय धनकवडे, आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. आमदार मेधा कुलकर्णी व योगेश टिळेकर यांनीही हजेरी लावली होती. सेनेच्या नीता मंजाळकर या नगरसेविका त्यांच्या उमेदवारासाठीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सभागृहात आल्या. त्यामुळे त्यांचे मतदान शेवटी झाले. त्यांचे मतदान मोजले गेले नाही. हरणावळ यांनी कृष्णा यांच्या लक्षात ही बाब आणून देण्याचा प्रयत्न केला; मात्र ‘ते नंतर पाहू’ असे सांगून त्यांना गप्प बसवले. महापौर-उपमहापौरांचे कोडकौतुक -वृत्त/३अभिनंदनासाठी सभागृहातच चढाओढ पारखी यांनी प्रत्येक सदस्याने हात वर करून, स्वत:चे नाव व प्रभाग क्रमांक सांगून मतदान करायचे आहे, असे स्पष्ट केले.मनसेचे गटनेते राजेंद्र वागस्कर यांनी मनसे तटस्थ राहणार असल्याचे सांगितले. मतदानानंतर जगताप व अलगुडे यांची निवड जाहीर करण्यात आली. त्या वेळी अभिनंदनासाठी सभागृहात चढाओढ सुरू झाली. त्यामुळे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी नव्या महापौरांना व नगरसचिवांना सभेचे कामकाज सुरू करा,असे स्मरण करून दिले. उपमहापौर आबा बागुल, कमल व्यवहारे, रवींद्र माळवदकर, अरविंद शिंदे आदींची जगताप, अलगुडे यांना शुभेच्छा देणारी भाषणे झाली.