शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

गणेशोत्सवात होणार महिला सुरक्षेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:55 IST

पुण्याच्या गणेशोत्सवात यंदा महिला सुरक्षेचा जागर होणार आहे. सर्व गणेशोत्सव मंडळांनी ‘ती’च्या सुरक्षेची जबाबदारी सामूहिकपणे उचलून ‘तू सुरक्षित आहेस,’ अशा आशयाच्या फलकांमधून प्रचार आणि प्रसार होऊ करण्याचा निर्णय ‘लोकमत’च्या व्यासपीठावर घेण्यात आला.

पुणे : पुण्याच्या गणेशोत्सवात यंदा महिला सुरक्षेचा जागर होणार आहे. सर्व गणेशोत्सव मंडळांनी ‘ती’च्या सुरक्षेची जबाबदारी सामूहिकपणे उचलून ‘तू सुरक्षित आहेस,’ अशा आशयाच्या फलकांमधून प्रचार आणि प्रसार होऊ करण्याचा निर्णय ‘लोकमत’च्या व्यासपीठावर घेण्यात आला. पुण्यातील मानाच्या गणपतींसह प्रमुख मंडळांनी यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले आहे.‘लोकमत’ची ‘ती’चा गणपती ही विधायक चळवळ आणखी पुढे नेताना ‘देऊ या ‘ती’ला सन्मान’ हे यंदाचे ब्रीद ठरविण्यात आले आहे. यासाठी पुण्यातील ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाºयांच्या चर्चासत्राचे आयोजन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले होते. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते. महिला आणि बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राणी भोसले, नगरसेविका ज्योत्स्रा एकबोटे, ज्येष्ठ लेखिका अश्विनी धोंगडे, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. माया तुळपुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी, महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्षा रूपाली पाटील, बांधकाम व्यावसायिक दर्शना परमार, वैैद्यकीय तज्ज्ञ डॉ. हरज्योत कौर, उद्योजिका मनीषा अगरवाल, कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. सुप्रिया कोठारी, सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. शैलजा मोळक, गायिका प्रियांका बर्वे, तुळशीबाग गणपती मंडळाच्या वैशाली खटावकर, पूनम शेंडे, प्रीतम कागणे, चंदा पाटील, रोहिना नागपाल, दीपा तावरे, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, गुरुजी तालीम मंडळाचे पृथ्वीराज परदेशी, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अनिरुद्ध गाडगीळ आणि वर्षा गाडगीळ, चेतन लोढा आदी मान्यवर बैैठकीला उपस्थित होते.‘लोकमत’चे संपादक ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, उपाध्यक्ष नीरज महाजन, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, महाव्यवस्थापक मिलन दर्डा, राकेश मल्होत्रा उपस्थित होते.गणपती ही विद्येची, कलेची देवता आहे. गणेशोत्सवाचा सोहळा साजरा होत असताना सर्व स्तरांमध्ये स्त्रियांचा सहभाग, महिलांची सुरक्षितता, पुरेशी आणि स्वच्छ स्वच्छतागृहे, व्यसनमुक्ती, विधायक उपक्रमांना प्रोत्साहन, उत्सवातून प्रबोधन, पुढील पिढीवर चांगले संस्कार आदी बाबींची अंमलबजावणी झाल्यास गणेशोत्सवाचे मंगलमय चित्र अधिकाधिक वृद्धिंगत होईल, अशी अपेक्षा विविध क्षेत्रांतील महिलांनी व्यक्त केली. ‘लोकमत’च्या वतीने पुण्यात गेल्या तीन वर्षांपासून पुण्यात सुरू करण्यात आलेल्या ‘ती’चा गणपती या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.पुण्यातील मंगलमय गणेशोत्सवात महिला सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक मंडळांनी पुढाकार घेतला आहे. संपूर्ण गणेशोत्सवात याचा जागर सर्व मंडळांतर्फे होणार आहे.विजय दर्डा म्हणाले, ‘‘ती’चा गणपती या उपक्रमातून समन्वयाची ताकद मिळावी. आपल्या संस्कृतीची पाळेमुळे रुजवताना इतरांच्या संस्कृतीचा आदर करावा, गणेशोत्सवातून सामाजिक प्रबोधन घडावे. स्वच्छता, सुरक्षितता आणि आरोग्याचा प्रश्न मार्गी लागावा आणि समाजात तिचा सन्मान केला जावा.’’‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर म्हणाले, ‘‘लोकमत’चा ‘ती’चा गणपती ही सांस्कृतिक चळवळ आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तिला तिचा सन्मान, अभिमान, अधिकार परत मिळावा, हाच या चळवळीमागचा हेतू आहे. ही चळवळ सर्व समाजाची व्हावी, सर्वांच्या सहभागाचे बळ मिळावे, अशी अपेक्षा आहे.’’लीना सलडाणा यांनी सूत्रसंचालन केले.