शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वरवंडनगरीत स्वागत   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 22:00 IST

ठिकठिकाणी स्वागतकमानी, रांगोळीच्या पायघड्या व घरासमोर रांगोळी काढून जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. 

ठळक मुद्दे स्वच्छतेचा संदेश, निर्मलग्राम, शेतकरी वाचवा, प्लॅस्टिकमुक्ती, डिजीटल इंडिया, बेटी बचाव हे संदेश देणारे फलक

वरवंड : टाळमृदंगाच्या निनादात व विठूनामाच्या गजरात जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात वरवंडनगरीत स्वागत करण्यात आले.श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतचा मुक्काम आटोपून बुधवारी (दि.११ जुलै) सकाळी मार्गस्थ झाला. दुपारी भांडगाव येथे न्याहारी उरकून चारच्या सुमारास चौफुला येथे पोहोचला. विश्रांती घेऊन व भक्तांचे दर्शन झाल्यानंतर पालखी सोहळा वरवंडच्या दिशेने मार्गस्थ झाला. पालखीचे स्वागत करण्यासाठी ग्रामस्थ गावाच्या वेशीवर मोठ्या संख्यने हजेरी लावली होती. टाळमृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत केले. ठिकठिकाणी स्वागतकमानी, रांगोळीच्या पायघड्या व घरासमोर रांगोळी काढून स्वागत करण्यात आले. मंदिराभोवती रिंगण केल्यानंतर ग्रामस्थांनी पालखी स्वत:च्या खाद्यावर उचलून मंदिरामध्ये ठेवली.  नैवेद्य ,आरती दाखविण्यात आल्यानंतर विणेकऱ्यांनी दर्शन घेतले व नंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. मंदिरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. ग्रामस्थांच्या वतीने जेवणाची व्यवस्था वसतिगृहाच्या मैदानावर करण्यात आली होती. स्वच्छतेचा संदेश, निर्मलग्राम, शेतकरी वाचवा, प्लॅस्टिकमुक्ती, डिजीटल इंडिया, बेटी बचाव हे संदेश देणारे फलक लावण्यात आले होते. याकडे लक्ष वेधले गेले. तसेच, प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसरामध्ये आपत्ती व्यस्थापन कक्ष व नियत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा