शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

आयव्हीएफ उपचारांमध्ये गेल्या पाच वर्षांत दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST

गर्भधारणेत अडचणी निर्माण होत असल्यास बरेचदा नात्यात तणाव निर्माण होतो. पती अथवा पत्नीच्या शरीरातील संप्रेरकांचे असंतुलन, पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या ...

गर्भधारणेत अडचणी निर्माण होत असल्यास बरेचदा नात्यात तणाव निर्माण होतो. पती अथवा पत्नीच्या शरीरातील संप्रेरकांचे असंतुलन, पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या अथवा स्त्रियांमधील बीजांडांची संख्या अशा अनेक कारणांमुळे वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. अशा वेळी आयव्हीएफ उपचारपद्धतीच्या मदतीने गर्भधारणा यशस्वी होऊ शकते, असे मत आयव्हीएफ तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. आयव्हीएफ उपचार पद्धतीत शुक्रजंतूच्या मदतीने बीजफलन केले जाते आणि त्यानंतर हे फलित बीज गर्भाशयात सोडले जाते. उपचार सुरु केल्यापासून सुमारे ८५ टक्के जोडप्यांना एका वर्षांमध्ये गर्भधारणा होऊ शकते, असेही सांगण्यात आले.

भारतामध्ये सहापैकी एका दांपत्याला व्यंध्यत्वाच्या समस्येने ग्रासले आहे. वंधत्वावर उपचार घेण्यात जेवढा उशीर होत जातो, तेवढी स्त्रीची प्रजननक्षमता क्षीण होत जाते. त्यामुळे व्यंध्यत्वावरील उपचारांमध्ये काही महिन्यांचा उशीरसुद्धा काही जोडप्यांसाठी नुकसानकारक ठरू शकतो. आजकाल आयव्हीएफ उपचार सेवा आॅनलाईन मिळणेही शक्य झाले आहे. स्टिम्युलेशन, मॉनिटरिंग, इन्जेक्शन ही सर्व प्रक्रिया रुग्णांच्या घरी, तर बिजांडाची निवड आणि भ्रूण हस्तांतरणाची प्रक्रिया क्लिनिकमध्ये केली जाते, असे वैैद्यकीय संचालक डॉ. दुर्गा राव यांनी सांगितले.

--------------------

विवाहाचे वय वाढल्यास अथवा उशिरा मूल होऊ देण्याचा निर्णय घेतल्यास बरेचदा गर्भधारणेत अडचणी येतात. असुरक्षित गर्भपातामुळे प्रजननक्षमता कमी झालेल्या जोडप्यांचे प्रमाण १० टक्के इतके आहे. अशा वेळी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित झालेली आयव्हीएफ उपचारपध्दती वरदान ठरत आहे. उपचारपध्दतीबाबतची उपयुक्तता लक्षात आल्याने जनजागृतीही वाढली आहे. आयव्हीएफ उपचारांमधून यश मिळण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे.

- डॉ. सुप्रिया पुराणिक, आयव्हीएफतज्ज्ञ

---------------------------

आयव्हीएफ उपचार घेणा-यांमध्ये गेल्या चार-पाच वर्षांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. उपचार सुरु असताना जोडप्यांनी तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा. आहारात ताजी फळे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्या यांचा समावेश करणे हिताचे ठरते. उपचार सुरु असताना धुम्रपान, मद्यपान टाळावे. आजूबाजूच्या लोकांकडून नानाविध सल्ले मिळतात, टोमणे ऐकावे लागतात. याकडे दुर्लक्ष करायला शिकावे. हलका व्यायाम, आवडीचा छंद जोपासणे आरोग्याचे दृष्टीने लाभदायक ठरते.

- डॉ. मयुरा जोशी, स्त्रीरोगतज्ज्ञ