शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या धोरणामुळेच शाळा बंद करण्याची वेळ

By admin | Updated: December 13, 2015 02:55 IST

शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांना मान्यता देताना अंतराचे निकष न पाळल्यामुळेच राज्यात ३ हजारांहून अधिक शाळांमध्ये २0 पेक्षा कमी विद्यार्थी असल्याचे चित्र समोर

पुणे : शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांना मान्यता देताना अंतराचे निकष न पाळल्यामुळेच राज्यात ३ हजारांहून अधिक शाळांमध्ये २0 पेक्षा कमी विद्यार्थी असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे शासनाने या शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे स्तलांतर करण्याचा विचार सुरू केला आहे. परिणामी पुढील काळात अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळांच्या पटपडताळणीची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त असल्याची माहिती समोर आली. या शिक्षकांचे समायोजन इतर शाळांमध्ये करणे अवघड गेले. आता विद्यार्थी संख्या असल्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. या सर्व शिक्षकांचे समायोजन अनुदानित शाळांमध्ये करावे लागेल. परिणामी रिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या जागा अपोआपच भरल्या जाणार आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी म्हणाले, राज्यातील केवळ डोंगरी किंवा आदिवासी भागातील शाळांमध्ये २0 पेक्षा कमी विद्यार्थी नाहीत. तर पश्चिम महाराष्ट्रातील व राज्यातील शहरी भागाजवळील शाळांमध्येसुद्धा हेच चित्र आहे. शासनाने पूर्वी सुमारे ८ हजार वस्ती शाळांना सरसकटपणे जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आल्यानंतर मागेल त्या ठिकाणी शाळांना मान्यता देण्याची प्रक्रिया राबविली. सुमारे ऐंशीच्या दशकात सुरू करण्यात आलेल्या आश्रमशाळांच्या शेजारी जिल्हा परिषदांच्या शाळांना मान्यता मिळाली. त्यातच ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी शहरी भागात स्थलांतर केले. परिणामी विद्यार्थी संख्या कमी होत गेली. शासनाने शाळांना मान्यता देताना केलेल्या चुकीमुळेच विद्यार्थ्यांचा तुटवडा निर्माण झाला.