शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन पासिंग अपॉर्इंटमेन्ट मिळण्यासाठी होतेय दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:52 IST

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दिवे येथे २५० मीटरचा पासिंग ट्रॅक तयार केला आहे.

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दिवे येथे २५० मीटरचा पासिंग ट्रॅक तयार केला आहे. मात्र, त्यामुळे पासिंगचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अनेक वाहनांना पासिंगची मुदत संपल्यानंतरही पासिंगसाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेन्ट घ्यावी लागते. परंतु, आरटीओच्या संकेतस्थळावरून पासिंगची अपॉर्इंटमेन्ट मिळत नसल्याने वाहनचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार १६ नोव्हेंबरपासून दिवे येथील २५० टेस्टिंग ट्रॅकवर वाहनांचे पासिंग केले जाते. मात्र, दररोज केवळ ७५ वाहनांचेच पासिंग होते. परंतु, पासिंगची मुदत संपलेले तब्बल सात हजार वाहनचालक अपॉर्इंटमेन्ट मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या एक महिन्याच्या अपॉर्इंटमेन्ट बुक झाल्या आहेत.मात्र, एक महिन्यानंतरची अपॉर्इंटमेन्ट मिळत नाही. ज्या वाहनांचे पासिंग संपले आहे, त्या वाहनचालकांना पासिंगसाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेन्ट घ्यावी लागते. त्यामुळे रात्री १२ वाजल्यापासून अनेक वाहनचालक संगणकासमोर बसून अपॉर्इंटमेन्ट मिळविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अपॉर्इंटमेन्ट काही मिळत नाही. त्यामुळे पासिंगची मुदत संपलेल्या वाहनचालकांना आरटीओ कार्यालयात फेºया माराव्या लागत आहेत.>हजारो वाहनांचे पासिंग रखडलेआरटीओमध्ये यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे हजारो वाहनांचे पासिंग रखडले आहे. मात्र, काही दिवसांपासून रिक्षा, टेम्पो, ट्रक, बस अशा विविध वाहनांचे पासिंग दिवे येथे सुरू करण्यात आले आहेत.या ट्रॅकवर पासिंगची व्यवस्था करण्यास सुरुवात झाली असली तरी अपॉर्इंटमेन्ट देण्याच्या यंत्रणेत अडचणी निर्माण होत आहेत. तसेच दररोज केवळ ७५ वाहनांना अपॉर्इंटमेन्ट दिली जात आहे. त्यातही पुढील महिनाभराच्या अपॉर्इंटमेन्ट बुक झाल्या आहेत. केवळ २ हजार २२५ वाहनांना अपॉर्इंटमेन्ट मिळाल्या आहेत. मात्र, पासिंगची मुदत संपल्याने अनेक वाहनांना व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे आरटीओ कार्यालयाने किमान वाहनांना पासिंगसाठीची अपॉर्र्इंंटमेन्ट देण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे वाहनचालकांना आपला व्यावसाय सुरूठेवता येईल, अशी मागणी प्रवासी व माल- वाहतूकदारांनी केली आहे.