शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाजत गाजत आलेगणराय

By admin | Updated: August 30, 2014 01:40 IST

ढोल ताशांच्या गजरात, वरुणाच्या अभिषेकात सर्वांच्याच लाडक्या गणरायाचे शुक्रवारी पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत आगमन झाले

पिंपरी : ढोल ताशांच्या गजरात, वरुणाच्या अभिषेकात सर्वांच्याच लाडक्या गणरायाचे शुक्रवारी पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत आगमन झाले. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच घरगुती गणपतीचेही उत्साहात स्वागत करण्यात आले. दुपारी आणि सायंकाळी झालेल्या पावसामुळे गणेशभक्तांची काही वेळ तारांबळ उडाली. अवघी उद्योगनगरी गणेशमय झाली आहे.अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या गणरायाचे आगमन झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. घरगुती गणपतींच्या प्रतिष्ठापनेस सकाळपासूनच सुरुवात झाली. ऐनवेळी धावाधाव नको यासाठी बहुतेक जणांनी दोन दिवस अगोदरच आवडती श्रींची मूर्ती आगाऊ नोंदणी करून ठेवली होती. त्यामुळे गणेशभक्तांसाठी अधिक सोईचे झाले. हातातील पाटावर गणरायाची मूर्ती, डोक्यावर टोपी, सोबत घंटीचा नाद आणि बाप्पांचा जयघोष असे चित्र दिसत होते. लाडक्या ‘श्रीं’ना घरी आणण्यासाठी गणेशभक्त कुटुंबासह जात होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता. मुहूर्ताच्या वेळेत बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यासाठी अनेकांची पळापळ सुरू असल्याचेही पहायला मिळाले. आपल्या घरातील बाप्पा आणि त्यांच्या सभोवतालची सजावट अधिकाधिक सुंदर कशी होईल याकडे गणेशभक्तांचे बारकाईने लक्ष होते. बाप्पाला लागणारा हार कसा असावा, बाप्पांचे आवडते पदार्थ, दुर्वा गड्डी, तसेच इतर वस्तूंचीही खरेदी केली जात होती. बाप्पा येणार म्हटल्यावर वातावरणही प्रसन्न असावे यासाठी घरातील तसेच परिसराचीही स्वच्छता करण्यात आली. अनेकांनी घराला रंगरंगोटीही केली आहे. नवीन वस्त्र परिधान करुन बाप्पांना घरी आणले. सार्वजनिक मंडळांतील ‘श्रीं’च्या मूर्तींची प्रतिष्ठापना सायंकाळी करण्यात आली. ढोल-ताशाच्या गजरात आगमन झाले. पावसाच्या सरी अंगावर कोसळत असतानाही कार्यकर्त्यांमधील जल्लोष कायम होता. सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये ‘श्रीं’ची मूर्ती, फेटे बांधलेले कार्यकर्ते, ढोल-ताशा पथक आणि बाप्पांचा जयघोष अशा वातावरणात सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पोलिसांच्या मदतीला स्वयंसेवकांची मदत घेण्यात येणार आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या स्वयंसेवकांना टी-शर्ट, शिटी, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)