शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटी’तील तरूणी असुरक्षित

By admin | Updated: January 31, 2017 04:14 IST

तळवडे येथे महिन्यापूर्वी सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या मूळच्या पश्चिम बंगालच्या अंतरा दास या तरुणीचा निर्घृण खून झाला. ही घटना ताजी असताना, हिंजवडी

पिंपरी : तळवडे येथे महिन्यापूर्वी सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या मूळच्या पश्चिम बंगालच्या अंतरा दास या तरुणीचा निर्घृण खून झाला. ही घटना ताजी असताना, हिंजवडी आयटी पार्कमध्ये आयटी अभियंता म्हणून काम करणाऱ्या रसिला राजू ओ पी या तरुणीचा रखवालदाराने गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. आयटी अभियंत्यांची ने-आण करणाऱ्या कॅबचालकाकडून तरी कधी रखवालदाराकडूनच गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडू लागले आहेत. अशा घटना वारंवार घडू लागल्या असून, कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत.तळवडे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क येथे २३ डिसेंबर २०१७ ला रात्री साडेआठच्या सुमारास कंपनीतून बाहेर पडल्यानंतर वाहनाच्या शोधात पायी जात असलेल्या अंतरा दास या तरुणीवर धारदार शस्त्राने आरोपीने हल्ला केला. त्यात ती ठार झाली. या घटनेनंतर आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली वाहन सुविधा सक्षम असते का? त्यांच्या सुरक्षिततेची दक्षता घेतली जाते का, याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या नयना पुजारी या तरुणीवर थेरगावातील कॅबचालकाने साथीदारांसह बलात्कार केल्याची घटना खळबळजनक घटना २००९ मध्ये घडली होती. त्या वेळीच आयटी क्षेत्रातील अभियंते, तसेच विशेषत: तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर सुभाष सेठी, दर्शन डोंगरे या आयटी अभियंत्यांचेही खून झाले. या घटना विस्मृतीत गेल्या होत्या. अंतरा दास हिचा २३ डिसेंबरला खून झाला. पाठोपाठ २९ जानेवारी २०१७ ला हिंजवडीतील कंपनीत काम करणाऱ्या रसिलाचा गळा आवळून खून करण्यात आला. या घटनांमुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. (प्रतिनिधी)सुरक्षारक्षक नेमताना दक्षता घेतली जावी१हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीत संगणक अभियंता पदावर काम करणाऱ्या रसिला ओ पी या तरुणीचा रखवालदारानेच खून केला. ही घटना गंभीर असून, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेबद्दल अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. अभियंत्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांवरील चालकांची नेमणूक करताना, त्यांची चारित्र्य पडताळणी केली जाते. पोलिसांकडून व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच त्यांची नेमणूक केली जाते. २रखवालदारांची नेमणूक खासगी सुरक्षा एजन्सीकडून केली जाते. त्या एजन्सीकडून पडताळणी होते की नाही, हे माहिती नाही. याबाबत निष्काळजीपणा दाखवला जात असेल, तर त्यात सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न केले जातील. आयटी परिसरातील सुरक्षेसंबंधी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे, असे हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पटवर्धन यांनी सांगितले.