शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भाषणबाजी करणाऱ्यांना विचारवंत म्हणणे चुकीचे

By admin | Updated: February 20, 2015 00:25 IST

‘एखादा विषय समजून न घेता त्यावर केवळ आवेशाने भाषणबाजी करून लोकांची मने जिंकणाऱ्या वक्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

पुणे : ‘‘एखादा विषय समजून न घेता त्यावर केवळ आवेशाने भाषणबाजी करून लोकांची मने जिंकणाऱ्या वक्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. विषयाचे पुरेसे ज्ञान, चिंतन, व्यासंग याचे भान नसणाऱ्या अशा वक्त्यांनाच सध्या विचारवंत समजले जात आहे. ही वृत्ती धोकादायक आहे,’’ असे मत ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी गुुरुवारी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे आणि महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय आयोजित गोपाळ कृष्ण गोखले स्मृतिशताब्दी कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी होते. याप्रसंगी गोखले यांचे नातू सुनील गोखले, महापौर दत्तात्रय धनकवडे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित निंबाळकर, कोषाध्यक्ष शांतीलाल सुरतवाला आदी उपस्थित होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व गोपाळ कृष्ण गोखले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. गोखले यांच्या राजकीय व सामाजिक विचारांचा आढावा घेताना डॉ. मोरे म्हणाले की, गांधीजींनी गोखले यांना आपले राजकीय गुरू मानले. सनदशीर व सात्त्विक वृत्तीने काम करणाऱ्या गोखले यांच्या स्वभावामुळे गांधीजींनी गोखले यांना निवडले. विशेष म्हणजे जेवढी प्रसिद्धी गांधीजींच्या वाट्याला आली, तेवढीच ती गोखले यांच्या वाट्याला येणे शक्य असतानाही त्यांनी मात्र पडद्यामागून समाजाचे भले कसे होईल, याचा सातत्याने विचार केला. विशिष्ट परिस्थितीत निर्माण झालेल्या एका राजकीय वातावरणाचा परिणाम गोखले यांच्यावर टिळकांच्या माध्यमातून दिसून आला. मात्र, भारतीय राजकारणाला वेगळी दिशा देण्यात गोखले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. (प्रतिनिधी)४सुनील गोखले म्हणाले की, आजच्या पिढीपर्यंत गोखले यांचा विचार पोहोचविणे गरजेचे असून महात्मा घडविण्याच्या त्यांच्या विचाराने एक काळ गाजवला. या प्रसंगी महापौर धनकवडे यांनी येत्या ९ मेपर्यंत गोखले यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्मारक करण्याची आपली भूमिका राहील, असे स्पष्ट केले. अंकुश काकडे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. जयराम देसाई यांनी सूत्रसंचालन केले.