शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाने आव्हानांचा सामना करणे शक्य

By admin | Updated: February 19, 2016 01:40 IST

आॅटोमोबाईल क्षेत्रात गेल्या काही वर्षांत फार मोठी प्रगती झाली आहे. हे क्षेत्र आता प्रत्येक आधुनिक नागरिकाच्या जगण्याचा भाग झाला आहे

पुणे : आॅटोमोबाईल क्षेत्रात गेल्या काही वर्षांत फार मोठी प्रगती झाली आहे. हे क्षेत्र आता प्रत्येक आधुनिक नागरिकाच्या जगण्याचा भाग झाला आहे, त्यामुळेच या क्षेत्रासमोर अनेक आव्हाने तयार झाली असून, तंत्रज्ञानाच्या साह्याने त्याचा सामना करता येईल, असे प्रतिपादन पीएमपीएलचे सहव्यवस्थापक द. गा. मोरे यांनी केले.पुण्यातील आॅटोमोबाईल क्षेत्राशी निगडित विविध कंपन्यांच्या वतीने आयोजित आॅटो एक्स्पो प्रदर्शनाचे उद््घाटन मोरे यांच्या हस्ते झाले. संयोजक पी. एन. आर. राजन, किशोर पिंगलीकर, प्रभाकर घोडेकर, प्रकाश कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते. राजन म्हणाले, ‘‘या क्षेत्रातील प्रगतीची सर्वसामान्यांना माहिती व्हावी, या हेतूने सन १९९२ मध्ये पहिले प्रदर्शन आयोजित करण्यात आले. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर या क्षेत्रातील विविध कंपन्यांना सामावून घेत प्रदर्शनाची व्याप्ती वाढवली गेली. आता अशी अनेक प्रदर्शने ठिकठिकाणी आयोजित होत असतात. त्यात वेगळेपणा आणायचा, या उद्देशाने आम्ही अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनाही यात संधी देण्यास सुरुवात केली. यावर्षी १५ पेक्षा अधिक महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प प्रदर्शनात सादर केले आहेत.’’पिंगलीकर यांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा उद्देश स्पष्ट करून, त्याचा फायदा होत असल्याचे सांगितले. मोरे यांच्या हस्ते परिवहन विभागातील विनाअपघात सेवा करणारे चालक आर. डी. देवगिरीकर, जी. एम. मोहिते तसेच पीएमपीएमएलचे चालक चंद्रशेखर भंडारी, प्रभाकर दिघे यांचा सत्कार करण्यात आला. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित हे प्रदर्शन २१ फेब्रुवारीपर्यंत रोज सकाळी ८ ते सायंकाळी ८ पर्यंत खुले राहणार आहे. (प्रतिनिधी)