शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

...आता परीक्षेला उशिरा नाही येता येणार

By admin | Updated: May 31, 2017 03:53 IST

दहावी-बारावीच्या परीक्षेला काही मिनिटे शिल्लक असताना प्रश्नपत्रिकांचे मोबाइलमध्ये फोटो काढून ते व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल करण्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : दहावी-बारावीच्या परीक्षेला काही मिनिटे शिल्लक असताना प्रश्नपत्रिकांचे मोबाइलमध्ये फोटो काढून ते व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल करण्याच्या प्रकाराला आळा घालण्याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडक उपाययोजना करण्यात येणार आहे. व्हॉटस्अ‍ॅपवरून पेपर फोडणारे विद्यार्थी परीक्षेला मुद्दामहून उशिरा येत असल्याचे निष्पन्न झाल्याने यापुढे उशिरा येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा नाही, याबाबत राज्य मंडळ विचार करीत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.याबाबत गंगाधर म्हमाणे म्हणाले, ‘‘पेपरफुटीला आवर घालण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहेत. समितींच्या शिफारशीनुसार याबाबत कडक उपाययोजना केल्या जातील. त्याचबरोबर ज्या ठिकाणांहून या प्रश्नपत्रिका फुटल्याचे निष्पन्न होईल त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.’’विद्यापीठांप्रमाणे परीक्षा केंद्रांना आॅनलाइन पद्धतीने प्रश्नपत्रिका काही वेळ अगोदर पाठविण्याचा पर्याय मात्र राज्य मंडळाला वापरता येणे शक्य नसल्याचे म्हमाणे यांनी स्पष्ट केले. मंडळाच्या प्रश्नपत्रिका या दहा ते बारा पानांच्या असतात, त्याचबरोबर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच मोठी असते. त्यामुळे इतक्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या दिवशी झेरॉक्स काढून प्रश्नपत्रिका वाटप करणे वास्तविक पातळीवर अत्यंत अवघड असल्याचे त्यांनी सांगितले.