शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात न्याय मिळतो, असे नव्हे! वकिलीचा झाला व्यापार: न्या. धनंजय चंद्रचूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 05:58 IST

मध्यस्थ म्हणून कायदा जाणणाऱ्या लोकांबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि सुबुद्ध नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयातील न्या. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : न्यायालयात जाऊनच न्याय मिळतो, असे नाही. तर सामाजिक प्रक्रियेतूनही प्रश्न सुटू शकतात. मध्यस्थ म्हणून कायदा जाणणाऱ्या लोकांबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि सुबुद्ध नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी शुक्रवारी व्यक्त केले. इंडियन लॉ सोसायटीच्या (आयएलएस) शताब्दीनिमित्त ‘देशात मध्यस्थाचे भवितव्य’ या विषयावरील व्याख्यानात न्यायमूर्ती चंद्रचूड बोलत होते.  

इंडियन लॉ सोसायटीज् सेंटर फॉर आर्बिट्रेशन अँड मिडिएशनचे (इल्स्का) उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या अध्यक्ष न्या. मृदुला भाटकर, उपाध्यक्ष पी. व्ही. करंदीकर, प्राचार्य वैजयंती जोशी, संचालक सत्या नारायण उपस्थित होते.

देशातील जिल्हा न्यायालयांमध्ये ४ कोटी, उच्च न्यायालयांमध्ये १ कोटी आणि सर्वोच्च न्यायालयात ७२ हजार खटले अजूनही प्रलंबित आहेत. न्यायालयाच्या नेहमीच्या प्रक्रियेतून हे खटले लवकर मार्गी लागणे शक्य आहे असे वाटत नाही, असे सांगून न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, आपल्या समाजाची रचना विषम असल्याने त्यांच्याकडील साधनेही विषम आहेत. मालक आणि कामगार, घरमालक आणि भाडेकरू किंवा अगदी पती-पत्नी यांच्यातील एक पक्ष नेहमीच अशक्त ठरू शकतो. व्यावसायिक भागीदार आणि पती-पत्नी यांच्यात विसंवाद होणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. अशा वेळी मध्यस्थ गरजेचा असतो. तसेच  न्यायालयीन मध्यस्थाची भूमिका वठवताना आपली कृती ही राज्यघटनेशी सुसंगत अशीच  असली पाहिजे. घटनाबाह्य वर्तन घडणार नाही, याची काळजी देखील घेतली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वकिलीचा झाला व्यापार

अलीकडच्या काळात वकिली क्षेत्राचे रुपांतर व्यवसायाकडून व्यापाराकडे झाले आहे. न्यायदानाच्या क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता जपली पाहिजे. वकील, न्यायाधीश, न्यायमूर्ती, घटनातज्ज्ञ यांनी सामान्य माणसाला समजेल, अशा भाषेत कायदा सांगितला पाहिजे. याकडेही  चंद्रचूड यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :Puneपुणे