शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

आयटी अभियंते ‘हायजॅक ’

By admin | Updated: August 29, 2016 03:14 IST

हिंजवडीतील मुख्य रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा बसला आहे. पोलीस व एमआयडीसी प्रशासनाच्या कृपाशीर्वादाने हिंजवडीतील सर्व मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण झाले असून पथारीवाले

वाकड : हिंजवडीतील मुख्य रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा बसला आहे. पोलीस व एमआयडीसी प्रशासनाच्या कृपाशीर्वादाने हिंजवडीतील सर्व मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण झाले असून पथारीवाले, फेरीवाले, फळविक्रेते, भाजीविक्रेत्यांनी पदपथासह मुख्य रस्त्यांवरील दोन्ही लेनमध्ये बस्तान मांडून जागा बळकावल्या आहेत.हिंजवडीतील शिवाजी चौकात चोहोबाजूंनी अतिक्रमण झाले आहे. यासह एमआयडीसीच्या हद्दीत असलेल्या रस्त्यांवर दुतर्फा अतिक्रमण झाल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. हिंजवडीतील बहुतांश रस्ते अतिक्रमणाने व्यापल्याने वाहने धावण्यासाठी प्रशस्त रस्तेच उरलेले नाहीत. परिणामी वाहतूक ढिम्म होऊन वाहतुकीची कोंडी होते. शिवाजी चौक ते मेझा नाईन चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. तसेच माणरोडला देखील अनेकांनी पदपथ गिळंकृत केले आहे. वाकड-हिंजवडी रस्त्यावर भुजबळवस्तीवरील अतिक्रमण महापालिकेला दूर करता आलेले नाही, तर भूमकरवस्ती व डांगे चौक रस्त्यावरदेखील अतिक्रमणांची समस्या वाढतच आहे. त्यामुळे रस्ते कितीही प्रशस्त झाले, तरी अतिक्रमणाच्या विळख्यात त्यांचा श्वास कोंडला असल्याचे चित्र पाहायला मिळते. आयटी सेक्टरमध्ये जरी प्रशस्त रस्ते बनवले असले, तरी एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यांवरही हॉटेलचालक व हातगाड्यावाल्यांनी जागा बळकावल्या आहेत. काहींनी तर पत्राशेड मारून अनधिकृत हॉटेल व्यवसाय सुरू केले आहे, तर फेज एकमध्ये एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या बाजूच्या रस्त्यावर खाऊगल्ली व चौपाटी तयार झाली आहे. प्रशासनाकडून कारवाईचा केवळ फार्स केला जातो. त्यानंतर परिस्थिती पूर्ववत होत असल्याचे चित्र आहे. अनधिकृत सहाआसनी रिक्षा रस्त्यावर बिनबोभाटपणे अस्ताव्यस्त लावल्या जातात. यामुळे वाहनांना तर अडचण होतेच यासह पादचाऱ्यांनादेखील जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालत जावे लागते. भर रस्त्यांवर वाहने पार्क करून स्थानिकांनी जणू ती कायदेशीर पार्किंगच बनविले असल्याचे चित्र काही रस्त्यावर दिसते. सर्वत्र वाहनांच्या रांगा आणि हातगाड्यांची गर्दी अशी अवस्था बहुतेक चौकात आहे. काही स्थानिकांनी शासकीय फुटपाथदेखील भाड्याने दिले आहेत. आयटीतील बहुतेक रस्ते प्रशस्त असले, तरी काही मुख्य चौकात आयटीकडे जाणारी वाहतूक अडकते. सकाळी आठ ते १२ अन् सायंकाळी चार ते रात्री नऊ या कालावधीत येथे वाहतूककोंडी नित्याची बनली आहे. सायंकाळी हिंजवडी-माण रस्त्यावर फेज एक इन्फोसिस सर्कलपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात, तर केपीआयटी रस्त्यावरदेखील रांगा लागतात. (वार्ताहर)