सिनेमागृहे, नाट्यगृहे, मनोरंजन पार्क, व्हिडिओ गेम, पार्लर, वॉटरपार्क, जलतरण तलाव, व्यायामशाळा (जिम), क्रीडा संकुले, क्लब इत्यादी़
* हॉटेल, रेस्टॉरंट, फूडकोर्ट (हॉटेलमधील रूम सर्व्हिससाठी वगळून तसेच पार्सल सेवा व घरपोच सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत सुरू राहील. शुक्रवारी सायंकाळी ६ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत केवळ घरपोच सेवेकरिता परवानगी राहील. मात्र हॉटेलमध्ये जाऊन पार्सल आणण्याची सुविधा असणार नाही.)
* सर्व स्पा, सलून, ब्युटी पार्लर, केशकर्तनालय संपूर्ण बंद
* महापालिका हद्दीतील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांचे नियमित वर्ग बंद राहतील़ (यातून इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा असल्याने त्यांना वगळण्यात येत आहे. ऑनलाईन शिक्षणास मुभा आहे़)
* सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, संमेलने यांना बंदी
* सर्व धार्मिक स्थळे पूर्ण बंद
--------------------
वृत्तपत्रांचे वितरण सुरळीत
* दैनंदिन वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिके, नियतकालिके छपाई व वितरण चालू राहणार. वर्तमानपत्रे घरोघरी वितरणास सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत परवानगी़
* रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांवरुन सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत पार्सल सेवा चालू.
* बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था असेल तर बांधकामे चालू राहतील़
--------------------------------