शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या भ्रष्ट अधिका-यांमागे लागणार चौकशीचा ससेमिरा

By admin | Updated: November 22, 2014 00:27 IST

गेल्या सात वर्षांत पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) सक्षम होण्याऐवजी काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे ती खिळखिळी झाली आहे.

पुणे : गेल्या सात वर्षांत पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) सक्षम होण्याऐवजी काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे ती खिळखिळी झाली आहे. त्यामुळे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याचे मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. त्यावर नगरसेवकांची मागणी लक्षात घेऊन संबंधितांची चौकशी करून पुढील कार्यवाही करण्याची सूचना पीएमपी सरव्यवस्थापकांना देण्यात येतील, असे आश्वासन आयुक्त कुणाल कुमार यांनी आज सर्वसाधारण सभेत दिले. पीएमपी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगातील फरक व आर्थिक तूट भरून काढण्यासाठी महापालिकेने ५० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मुख्यसभेत आला. त्या वेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पीएमपीच्या गैरकारभारावर ताशेरे ओढले. गेल्या सात वर्षांत महापालिकेने पीएमपीला ४०७ कोटी रुपये देऊन, कारभार सुधारला नाही. त्याला पीएमपीचे काही अधिकारी जबाबदार असून, नवीन आयएएस दर्जाचा अधिकारी नियुक्त केला पाहिजे, अशी मागणी उपमहापौर आबा बागुल यांनी केली. पीएमपी संचालक मंडळ व मुख्यसभेचेही मुजोर अधिकारी ऐकत नाहीत, असा आक्षेप नगरसेवक अप्पा रेणुसे यांनी घेतला. पीएमपीचे मार्ग अधिक अन् कर्मचारी कमी, तर पिंपरी चिंचवड हद्दीतील मार्ग कमी अन् कर्मचारी दुप्पट आहेत. हासुद्धा एक घोटाळा असून, सीआयडीतर्फे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली. बुरसे व माने हे दोन्ही अधिकाऱ्यांची शैक्षणिक पात्रता नसताना पीएमपीमध्ये अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. हा प्रकार थांबविण्यास पीएमपी संचालक मंडळ असमर्थ आहे. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत, असा आरोप नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला. त्यावर नगरसेवक प्रशांत जगताप यांनी आपेक्ष घेतला. पीएमपी कामगारांसाठी, की ठेकेदारांसाठी असा सवाल नगरसेवक विजय देशमुख यांनी उपस्थित केला. पीएमपीऐवजी ठेकेदारांतर्फे बस चालविल्या जात असल्याने अधिकाऱ्यांंना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी शिवसेना गटनेते अशोक हरणावळ यांनी केली.(प्रतिनिधी)