शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्तांचा लागेना तपास

By admin | Updated: January 9, 2017 03:11 IST

पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडल तीनच्या हद्दीत तरूण, तरूणी बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. महिन्यात किमान तीन ते चार अल्पवयीन

पिंपरी : पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडल तीनच्या हद्दीत तरूण, तरूणी बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. महिन्यात किमान तीन ते  चार अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या घटना घडू लागल्या आहेत. बेपत्ता व्यक्तींचा पोलिसांकडून तपास लागण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. पिंपळे गुरव परिसरातून १६ वर्षांची युवती बेपत्ता होऊन वर्ष उलटले, तरीही काही थांगपत्ता लागला नाही. कुटुंबीयांनी याबाबत पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांना भेटून आपली व्यथा मांडली. सांगवी पोलिसांकडून मात्र त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, अशी नातेवाइकांची तक्रार आहे. याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांच्याकडे संबंधित संशयित आरोपीवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. स्वप्नाली मनोज मल्लाव (वय १६, रा. काची चाळ, दापोडी) असे त्या बेपत्ता युवतीचे नाव आहे. स्वप्नाली ही दापोडीमधील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शिक्षण घेत होती. स्वप्नालीचे काही बरे-वाईट झाले नाही ना, अशी भीती नातेवाईक व्यक्त करत आहेत.कोणाचा तरी फोन आला अन् बाहेर गेलेला विनायक महिंद्रा खांडेकर हा १७ वर्षांचा तरूण १ जानेवारीला संत तुकारामनगर येथील घरातून बाहेर पडला असून अद्याप तो परतला नाही. त्याचे कोणीतरी अपहरण केले असावे, असा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. संतोष सिद्धराम धोत्रे हा गणेशनगर, पिंपळे निलखमधून बेपत्ता झाला. १६ डिसेंबर २०१६ ला बेपत्ता झालेला संतोष अद्याप घरी परतला नाही. अशा बेपत्ता होण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. मोबाइल लोकेशन, तसेच कॉल रेकॉर्डच्या आधारे अशा बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे शक्य असताना, पोलिसांकडून मात्र तातडीने हालचाली होत नाहीत. (प्रतिनिधी)संशय व्यक्त केल्यानंतरही पोलिसांची उदासीनता फूस लावून पळवून नेणाऱ्यांवर नातेवाइकांनी संशय व्यक्त केल्यानंतरही पोलीस संशयितांची कसून चौकशी करत नाहीत. संशयित व्यक्तींची नावे दिल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करणे अपेक्षित आहे. त्यांच्या मोबाइलचे कॉल रेकॉर्ड तपासल्यास अशा बेपत्ता अथवा अपहरण केलेल्या व्यक्तींचा शोध घेता येऊ शकतो. पोलिसांकडून अशा घटनांची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने वेळीच बेपत्ता व्यक्तींचा तपास लागत नाही. अशा व्यक्तींचा घातपात घडवून आणल्याचे नंतर निष्पन्न होते. वेळीच पोलिसांनी गंभीर दखल घेतल्यास अशा घटनांचा उलगडा होईल. संकटात असलेल्या व्यक्तीला मदत मिळू शकेल, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.