शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू

By admin | Updated: January 9, 2017 03:43 IST

आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास रविवारपासून सुरुवात करण्यात आली.

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास रविवारपासून सुरुवात करण्यात आली. पक्षाकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार उमेदवारांनी कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता, मुलाखतीला सामोरे गेले. सर्व उमेदवारांच्या अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ‘वन टू वन’ मुलाखती घेण्यात आल्या. या वेळी उमेदवारांसमवेत एकाही कार्यकर्त्याला आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. भाजपाकडून पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक १ ते १०मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. प्रभाग १ ते १०चा बहुतांश भाग हा वडगाव शेरी व औंध, पाषाण, बालेवाडी येथील होता. त्याला इच्छुकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी ९ वाजल्यापासून मुलाखतींना प्रारंभ झाला. पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, विजय काळे, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर, सरचिटणीस मुरली मोहोळ, उज्ज्वल केसकर, दीपक मिसाळ, गणेश घोष, महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला मेंगडे, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे, अनुसूचित जाती मोर्चाचे समन्वयक डॉ. भरत वैरागे यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.सुरुवातील उमेदवारांकडून त्यांच्या कामाची माहिती दिली जायची. त्यानंतर निवड समितीमधील सदस्यांकडून उमेदवारांना प्रश्न विचारले जायचे. त्यामध्ये तुम्ही मागची निवडणूक लढविली होती का, किती मते पडली होती, तुमच्या पॅनलमध्ये इतर कोणते सदस्य असावेत आदी विचारणा केली जात होती. काही उमेदवार मोठ्या आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरे जात होते, तर काहीजणांना मुलाखत देताना घाबरल्यासारखे झाले. प्रत्येक इच्छुक उमेदवाराला ‘वन टू वन’ पॅनलसमोर बोलावून त्याचे म्हणणे ऐकून घेण्यात आले, त्यामुळे सकाळी सुरू झालेल्या मुलाखती रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्या. सोमवारी प्रभाग क्रमांक ११ ते २०, मंगळवारी २१ ते ३० आणि बुधवारी ३१ ते ४१ प्रभागांच्या मुलाखती होणार आहेत. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पहिल्या पाच प्रभागांच्या आणि दुपारी ३ ते रात्री ८ उर्वरित पाच प्रभागांच्या मुलाखती होणार आहेत. पक्षाकडून एकूण १०९२ इच्छुकांनी अर्ज नेले होते. त्यापैकी ८७० जणांनी अर्ज भरून पक्षाकडे दिले आहेत. पुरुष इच्छुकांची संख्या ४९० आणि महिला इच्छुकांची संख्या ३८० इतकी आहे.