शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

आंतरराष्ट्रीय दर्जाची मेट्रो सिटी

By admin | Updated: February 15, 2017 02:14 IST

शहराला सुखी, शांत व समृद्ध बनवून राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवडला आंतरराष्ट्रीय मेट्रो सिटी बनवणार आहे. राष्ट्रवादीची

पिंपरी : शहराला सुखी, शांत व समृद्ध बनवून राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवडला आंतरराष्ट्रीय मेट्रो सिटी बनवणार आहे. राष्ट्रवादीची पिंपरी-चिंचवडमध्ये बहुमताने सत्ता येणे गरजेचे असून, प्रत्येक कार्यकर्त्याने त्यासाठी एकजुटीने व एकदिलाने काम करणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे व्यक्त केले.पुण्यातील मोदीबाग या पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचा पिंपरी-चिंचवडसाठीचा जाहीरनामा प्रकाशित केला. त्या वेळी पवार बोलत होते. या वेळी माजी आमदार विलास लांडे व अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, तसेच योगेश बहल, हनुमंत गावडे, निवृत्ती शिंदे, फजल शेख, विजय लोखंडे, जगदीश शेट्टी, अरुण बोऱ्हाडे, विजय लोखंडे, प्रकाश सोमवंशी आदी उपस्थित होते.राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही हे केले व आम्ही हे करणार असे दोन टप्पे दाखवले आहेत. जी विकासकामे झाली, ती दाखवली आहेत. तसेच सत्तेवर आल्यानंतर कोणती विकासकामे करणार असेही सांगितले आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीचा जाहीरनामाध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, वाहतूक पोलीस यांच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड शहर हॉर्नमुक्त करणारदेहू व आळंदी ही देवस्थाने पिंपरी-चिंचवडमध्ये समाविष्ट करणारजगत्गुरू संत तुकाराम संतपीठ उभारणारकचरा संकलनाचे १०० टक्के उद्दिष्ट ठेवून पिंपरी-चिंचवड कचराकुंडीमुक्त शहर करणारहिंजवडी, माण, मारुंजी, गहुंजे, जांबे, नेरे आणि सांगवडे ही सात गावे पिंपरी-चिंचवडमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणारसर्व झोपडपट्यांमध्ये मोफत वाय-फाय सुविधा पुरवणारसर्व शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा देणारआंद्रा धरण, भामा-आसखेडमधून पाणी आणणार घनकचरा व्यवस्थापनासाठी पुनावळेतील शासकीय जमीन ताब्यात घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणारशहरातील सर्व मोठे चौक सिग्नलविरहित करणार येत्या पाच वर्षांत तळवडे येथे गायरान जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान व प्राणिसंग्रहालय साकारणारमुळा नदीवर नवीन पूल बांधून बोपखेलपासून खडकीकडे जाणारा रस्ता विकसित करणार, तसेच बोपखेलवासीयांसाठी ५० कोटी रुपये खर्चाचा पूल उभारणारभोसरीपासून चाकणपर्यंत बीआरटीएस सुरू करणार, तर हिंजवडीमध्ये बीआरटीएस टर्मिनल उभारणारपंतप्रधान आवास योजनेंतर्गत पाच वर्षांत घरे बांधणारबचत गटांसाठी आॅनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून देणारसिंगापूरच्या धर्तीवर भव्य अ‍ॅक्वेरिअम व उद्योगनगरीचा प्रवास सांगणारे इंडस्ट्रियल म्युझिअम उभारणार.