नारायणगाव : नारायणगाव विभागाअंतर्गत अनेक गावांतील शेतकऱ्यांचे शेतीपंपाची वीज तोडण्याचे व ट्रान्सफाॅर्मर बंद करण्याचे काम वीज वितरण कंपनी करीत असल्याने शेतकऱ्यांसह वीज ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने वीज खंडित करू नये अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख, माजी आमदार शरद सोनवणे यांनी दिला आहे. यांसदर्भात नारायणगाव येथील महावितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख माऊली खंडागळे, सरपंच योगेश पाटे, आनंद रासकर, संतोष वाजगे, सह्याद्री भिसे, आरिफ आतार, अनिल खैरे, विकास तोडकरी, गौतम औटी, भाऊ मुळे, जालिंदर खैरे, हर्षल गावडे,धोंडिभाऊ मुळे आदी सह शेतकरी,शिवसैनिक उपस्थित होते.
शरद सोनवणे म्हणाले की, सध्या पाऊस लांबला असून शेतकऱ्यांच्या शेतीतील उभी पिके करपली जात आहे. अशातच जुन्नर तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या नारायणगाव विभागाकडून शेतकऱ्यांचे शेती पंपाची वीज जोड व इतर ग्राहकांची वीज खंडित केली जात आहे. सध्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, कृषी धोरण २०२० ची योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नसल्याने त्यासंदर्भात जनजागृती करण्याची मागणी त्यांनी केली.
माऊली खंडागळे म्हणाले की, वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांना वेठीस धरून सुलतानी वसुली करीत आहेत . अनेक वीज ग्राहकांनी वीज बिल भरून हीर त्यांची वीज खंडित केली आहे. हा अन्याय होत आहे. वायरमन यांच्याकडून शेतकऱ्यांना चुकीची मिळणारी वागणूक सहन केली जाणार नाही, अशा इशारा त्यांनी यावेळी दिला.
सरपंच योगेश पाटे यांनी नारायणगाव व परिसरातील वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनीच्या वारूळवाडी येथील कार्यालयात जाण्यासाठी वेळ व पैसे याचा ताण व गैरसोय होत असल्याने नारायणगाव ग्रामपंचातीच्या माधमातून जागा व इतर सुविधा देण्यात येतील, अशी माहिती देऊन दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी वीज वितरणचे दोन कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून ग्राहकांच्या अडचणी सोडवतील.
१८ नारायणगाव
महावितरणचे सिद्धार्थ सोनवणे यांना निवेदन देताना शरद सोनवणे, माऊली खंडागळे, योगेश पाटे व इतर.
180821\mseb photo shivsena.jpg
नारायणगाव वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे मोटार कनेक्शन व ट्रान्स्फार्मर बंद करू नये या आशयाचे निवेदन उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ सोनवणे यांना देताना शिवसेना जिल्हा प्रमुख शरद सोनवणे , माऊली खंडागळे , योगेश पाटे व मान्यवर