शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मास्कवरून डॉक्टरांनाच शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कल्याणीनगर येथील एका उच्च सोसायटीत मास्क वापरण्याविषयी डॉक्टरांनी मुलाला सल्ला दिल्यानंतर त्याच्या वडिलांनी डॉक्टरांनाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कल्याणीनगर येथील एका उच्च सोसायटीत मास्क वापरण्याविषयी डॉक्टरांनी मुलाला सल्ला दिल्यानंतर त्याच्या वडिलांनी डॉक्टरांनाच शिवीगाळ करण्याचा प्रकार समोर आला. शेवटी पोलीस चौकीत वडिलांनी माफी मागितल्यावर याविषयावर पडदा टाकण्यात आला. मात्र, तोपर्यंत मुलगा व त्याचे वडील ज्या पद्धतीने कोविडसाठी काम करणार्‍या डॉक्टरांशी संभाषण करत होते, त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यामुळे शहरात याची एकच चर्चा सुरु होती.

कल्याणीनगरमधील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला. येथे राहणाऱ्या व कोविडसाठी काम करणार्‍या एका डॉक्टरांनी मास्क न वापरणाऱ्या एका मुलाला मास्क वापरण्याचा सल्ला दिला. मी कोविड रुग्णांमध्ये काम करतो, मला झाला असेल तर तुलाही होईल, असे सांगितले. यावर तो मुलगा उर्मटपणे डॉक्टरांनाच उलटा बोलला. शिवाय मला कोरोना होऊन गेला आहे. त्यानंतर त्याने आपल्या वडिलांना काहीबाही सांगितले. त्याचे वडील या डॉक्टरांच्या घराबाहेर तावातावाने आले. त्यांनी आमच्या मुलाला शिकवायची गरज नाही. असे काहीबाही बोलून डॉक्टरांना शिवीगाळ केली. आम्हाला लिफ्ट वापरु नका, असे सांगणारे तुम्ही कोण असे म्हणत आदळआपट केली. त्यानंतर सोसायटीच्या चेअरमनसह सर्व जण रामवाडी चौकीत गेले. तेथे मुलाच्या वडिलांनी डॉक्टरांची लेखी माफी मागितली. डॉक्टरांनीही हा आमच्या सोसायटीतील प्रकार असल्याने आम्ही सामंजस्याने मिटवित असल्याचे सांगून त्यावर पडदा टाकला.