शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

विशाखा समिती तातडीने स्थापन करण्याचे आदेश

By admin | Updated: March 31, 2015 00:25 IST

कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी महिला तक्रार निवारण समिती (विशाखा समिती) करणे सर्व शासकीय, निमशासकीय व

पुणे : कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी महिला तक्रार निवारण समिती (विशाखा समिती) करणे सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालये, संस्थांना बंधनकारक आहे. ज्या कार्यालयांमध्ये ही समिती स्थापन झालेली नाही त्यांनी १० एप्रिलपर्यंत समिती स्थापन करण्याचे आदेश महिला व बाल विकास आयुक्त राजेंद्र चव्हाण यांनी सोमवारी दिले. तसेच स्थापन झालेल्या समितींच्या कामकाजाचा अहवाल देण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या आहेत. ‘लोकमत’ने विविध कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांचे विशाखा समितीबाबत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये शहरातील तब्बल ८६ टक्के महिलांना ‘विशाखा’बाबत माहितीच नसल्याचे समोर आले. याबाबतचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. आजही बहुतेक कार्यालयांमध्ये समितीच स्थापन करण्यात आलेली नाही तर काही समित्या केवळ कागदोपत्रीच आहेत. त्याची तातडीने दखल घेऊन महिला व बाल विकास आयुक्त राजेंद्र चव्हाण यांनी हे आदेश दिले आहेत. सर्व संंबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी विशाखा समितीबाबत आढावा घेण्याचे आदेश दिले. चव्हाण म्हणाले, ‘‘ज्या संस्थांनी अजूनही ही समिती स्थापन केलेली नाही, त्यांना १० एप्रिलपर्यंत समिती स्थापन करण्याबाबत सांगण्यात येईल. त्याबाबत राज्यातील सर्व विभागीय उपायुक्तांना सूचना दिल्या जातील. तसेच स्थापन झालेल्या समितींच्या कामकाजाचा अहवालही मागविला जाईल. (प्रतिनिधी)