यंदाच्या वर्षी ‘न्याती’ उद्योग समूहाचे ‘ती चा गणपती’ला प्रायोजकत्व लाभले आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून ‘ती चा गणपती’ सोहळा दहा दिवस पार पडणार आहे. आपल्या कर्तृत्वाने जगातील दाही दिशा कवेत घेणाऱ्या ‘ती’च्या अपूर्णते’चे वर्तुळ या संकल्पनेमुळे खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहे. यंदा ‘ती च्या गणपती’चे आठवे वर्ष आहे. समाजात प्रतीकांना महत्त्व असताना गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शुक्रवारी ‘श्रीं’’च्या मूर्तीची धार्मिक पद्धतीने अंजली राक्षे यांच्या पौराहित्याखाली मंडळाच्या अध्यक्ष सुषमा नेहरकर-शिंदे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली.
लोकमत ‘ती चा गणपती’ची आकर्षक गणेशमूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.‘संकल्पसिद्धी’ ही यंदाच्या ‘ती चा गणपती’ची संकल्पना आहे. समाजातील सर्व स्तरांवर स्त्री शक्तीचा जागर होत महिला सुरक्षेची संकल्पसिद्धी व्हावी हीच शक्ती ‘ती चा गणपती’ कडून मिळावी हाच यामागील उद्देश आहे.
---------------------------------