शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान

By admin | Updated: January 14, 2017 03:10 IST

राष्ट्रमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान होत्या, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि. १२) इंदापूर

इंदापूर : राष्ट्रमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान होत्या, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि. १२) इंदापूर महाविद्यालयात बोलताना व्यक्त केले.राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त शिवभक्त परिवार व तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पाटील म्हणाले, की जिजाऊंनी शिवरायांना एकता व सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. म्हणूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतदेखील राष्ट्रभक्ती निर्माण होऊन हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. स्वामी विवेकानंदांनी युवा शक्ती हीच राष्ट्राची शक्ती आहे. युवकांनी राष्ट्रउभारणीत योगदान द्यावे.लक्ष लढाक संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा प्रभुदेसाई म्हणाल्या, की सीमेवर शूरपणे लढणाऱ्या सैनिकांमुळे देश व नागरिकांचे संरक्षण होत असते. त्यामुळे सैनिकांचे शौर्य लक्षात घेऊन युवा पिढीने देशसेवेला प्राधान्य द्यावे. कामधेनू परिवाराचे संस्थापक डॉ. लक्ष्मण आसबे यांचे ‘रणरागिणी माँसाहेब जिजाऊ’ या विषयावर भाषण झाले.कोल्हापूर येथील राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शिवकालीन मर्दानी चित्तथरारक खेळांनी उपस्थितांची मने जिंकली. संदीप सावंत यांच्या ऐतिहासिक शस्त्रसंग्रहाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी नगराध्यक्षा अंकिता शहा, मंगेश पाटील, विलासराव वाघमोडे, भरत शहा, बापू जामदार उपस्थित होते. विजयकुमार फलफले यांनी सूत्रसंचालन केले. सोहम घोडके यांनी आभार मानले.संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांच्या हस्ते वीरमाता बायडाबाई दत्तात्रय रास्ते यांना पहिला जिजाऊ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. लिंगाणा किल्ला सर करणाऱ्या १९ शिवभक्तांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मालोजीराजे भोसले यांची प्रतिमा संस्थेचे सचिव मुकुंद शहा व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. (वार्ताहर)