शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत समाविष्ट गावांमधील बेकायदा बांधकामांवर संक्रांत, उपग्रहाच्या साह्याने करणार पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 07:03 IST

राज्य सरकारच्या अधिसूचनेद्वारे अखेर महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील बांधकामांवर महापालिका प्रशासन उपग्रहाच्या साह्याने नजर ठेवणार आहे.

पुणे : राज्य सरकारच्या अधिसूचनेद्वारे अखेर महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील बांधकामांवर महापालिका प्रशासन उपग्रहाच्या साह्याने नजर ठेवणार आहे. बेकायदा बांधकामांवर त्वरित कारवाई करण्यात येईल. यापुढे नियमानुसारच बांधकामांना परवानगी दिली जाईल. सर्व गावांचा संपूर्ण सर्व्हेही जीआयएस या यंत्रणेच्या साह्याने करून घेण्यात येणार आहे.महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ही माहिती दिली. या गावांमधील सद्यस्थितीचा आढावा तसेच यापुढे काय करता येईल याची चर्चा करण्यासाठी आयुक्तांनी शुक्रवारी दुपारी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. त्यात अधिकाºयांनी महापालिकेत गावे समाविष्ट होणार याची खात्री असल्याने बेकायदेशीर बांधकामांचे या गावांमध्ये पेवच फुटले होते, त्याला आळा घालण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यासाठीच अत्याधुनिक यंत्रणेद्वारे गावांचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे आदेश अधिकाºयांना दिले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.समाविष्ट झालेल्या उरुळी देवाची, फुरसुंगी, लोहगाव, शिवणे, मुंढवा, साडेसतरा नळी, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक आणि शिवणे या गावांचा विस्तृत विकास आराखडाही तयार करण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले. नागरिकांच्याही महापालिकेकडून अपेक्षा असतील. प्रशासन या सर्व गावांमधील नागरिकांसमवेत बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेईल असे आयुक्त म्हणाले. रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा व शिक्षण या गोष्टींना प्राधान्य देउन पुढील सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल. गावांलगतच्या पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून या कामाचे नियोजन करण्यात येईल़

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका