शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सासवडचा कचरा सासवडमध्येच जिरवा

By admin | Updated: April 21, 2016 01:11 IST

शहरांनी आपला कचरा आपल्याच हद्दीत छोटे-छोटे बायोगॅस व कंपोस्ट प्रकल्प उभारून जिरवावा, असे राज्य शासनाचे धोरण आहे

खळद : शहरांनी आपला कचरा आपल्याच हद्दीत छोटे-छोटे बायोगॅस व कंपोस्ट प्रकल्प उभारून जिरवावा, असे राज्य शासनाचे धोरण आहे. पुणे शहराच्या विविध भागांत असे ३५ प्रकल्प चालू आहेत. त्यासाठी अवघी ३ ते ५ गुंठे जागा लागते. सासवड नगरपालिकेनेही आहे त्या जागेत दुर्गंधीविरहित प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव द्यावा. त्याला मंजुरी व आवश्यक निधीची तरतूद राज्य शासन करेल, असे निर्देश नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी बुधवारी सासवड नगरपालिकेला दिले.कुंभारवळण येथील सासवड नगरपालिकेच्या कचरा डेपोप्रश्नी पाटील व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. तीत हे निर्देश देण्यात आले.बैैठकीत पुणे मनपाचे उपायुक्त सुरेश जगताप यांनी पुण्यात अवघ्या ३ ते ५ गुंठे जागेत उभारलेल्या बायोगॅस व कंपोस्ट प्रकल्पाच्या माहितीचे सादरीकरण केले. यानंतर राज्यमंत्री पाटील यांनी, सासवड नगरपालिकेला पुरंदर हायस्कूलसमोर कचरा डेपोसाठी राज्य सरकारने जवळपास साडेचार एकर जागा दिलेली होती. या जागेवर व्यावसायिक वापराचे आरक्षण टाकून कचरा प्रकल्प कुंभारवळणला हलवणे अन्यायकारक ठरेल. कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीची ना हरकत आवश्यक असते. नगरपालिकेने ती मिळवली नाहीच; शिवाय घालून दिलेले निकषही पूर्ण केलेले नसल्याने हा प्रकल्प रेटणे उचित ठरणार नाही. त्यामुळे नगरपालिकेने बायोगॅस व कंपोस्ट प्रकल्पासाठी मागणी करावी, सरकार त्याला व्हीजीएफ फंडातून निधीच्या तरतुदीसह मंजुरी देईल. हरित लवादाच्या सूचनांचा पूर्णपणे आदर राखून कुंभारवळण ग्रामस्थांवर अन्याय न करता हा मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असेही पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले.राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, ‘‘आजच्या बैठकीत झालेला निर्णय हा सासवड व कुंभारवळण दोन्ही बाजूंसाठी योग्य आहे. सासवड नगरपालिकेने लवकरात लवकर प्रस्ताव सादर केल्यास हा प्रश्नच निकालात निघेल. शासन सर्व सहकार्य नगरपालिकेला करण्यास तयार आहे.’’या बैठकीला नगरविकास विभागाचे अव्वल सचिव संजय सावजी, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार संजय पाटील, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, नगरसेवक राजेश दळवी, अभिजित जगताप, धीरज जगताप, अजित जगताप, पं. स. सदस्य दत्ता झुरंगे, रामभाऊ झुरंगे, देविदास कामठे, नारायण खळदकर, राजेंद्र टिळेकर, कुंभारवळणचे सरपंच अमोल कामठे, वनपुरीच्या सरपंच लक्ष्मी कुंभारकर, उदाचीवाडीच्या सरपंच सुनंदा झेंडे उपस्थित होते. (वार्ताहर)