शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्जवाटप प्रकरणांची चौकशी अपूर्णच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 04:16 IST

विविध मायक्रो फायनान्स कंपन्यांनी राज्यभरातील हजारो नागरिकांना विनातारण दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जवाटप प्रकरणांच्या चौकशीसाठी, राज्य सरकारने प्रशासकीय समिती स्थापन केली आहे. मात्र, या समितीचे काम अद्याप अपूर्ण आहे.

लोकमत न्यजू नेटवर्कमुंबई : विविध मायक्रो फायनान्स कंपन्यांनी राज्यभरातील हजारो नागरिकांना विनातारण दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जवाटप प्रकरणांच्या चौकशीसाठी, राज्य सरकारने प्रशासकीय समिती स्थापन केली आहे. मात्र, या समितीचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे या कंपन्यांद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी करायच्या उपाययोजना कागदावरच राहिल्या आहेत. पर्यायाने नागपूर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेखालील या समितीला अहवाल सादर करण्यास, ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याच्या निर्णय गृहविभागाने घेतला आहे.या कंपन्यांची चौकशी करून अहवाल बनविण्यासाठी समितीला देण्यात आलेल्या ६० दिवसांच्या मुदतीत काहीच कार्यवाही झालेली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या अहवालातून विविध कंपन्यांचे गैरव्यवहार चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कमी व्याजदराने विनातारण कर्ज देण्याच्या अमिषाने नागरिकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे या कंपन्यांचा व्यवहार व कार्यपद्धतीच्या चौकशीसाठी राज्य सरकारने गेल्या १२ एप्रिलला नागपूरच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली होती. मात्र, आयुक्तांकडे असलेला नियमित कामाचा व्याप आणि अन्य विविध जबाबदाºयांमुळे, कंपन्यांच्या चौकशीचा ‘श्रीगणेशा’ही योग्य प्रकारे झालेला नाही. त्यामुळे अहवाल सादर करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत द्यावी, अशी मागणी समितीकडून करण्यात आली. त्यानुसार, त्यांचा कालावधी वाढविण्यात आल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.