शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

गजा मारणे याची खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST

पुणे : टोळीयुद्धातून अमोल बधेच्या खून प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई केलेल्या गजानन पंढरीनाथ मारणे याच्यासह २० साथीदारांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता ...

पुणे : टोळीयुद्धातून अमोल बधेच्या खून प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई केलेल्या गजानन पंढरीनाथ मारणे याच्यासह २० साथीदारांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

विशेष मोक्का न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी हा न्यायनिवाडा केला असून, पुराव्याच्या अभावी सदरील आरोपींची मुक्तता केली असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. प्रस्तुत प्रकरणात आरोपीतर्फे अँड सुधीर शहा, अँड विजयसिंह ठोंबरे, अँड विपुल धुशिंग व अँड सिद्धार्थ पाटील यांनी कामकाज पाहिले आहे.

गजानन मारणे (वय ४९), रूपेश मारणे (वय ३१), मंदार ऊर्फ विकी सुरेश बांदल ( वय २६), बालाजी कमलाकर कदम (वय २२), सागर श्रीरंग डिम्बळे (वय २४), विक्रम विलास समुद्रे (वय २४), विशाल ऊर्फ गोट्या श्रीरंग डिम्बळे (वय २५), राहुल उर्फ बंटी रामकृष्ण कळवणकर (वय २१), तुषार बाळासाहेब बधे (वय २५), आकाश राजेश अवचर (वय २१), अक्षय राजू वेडे (वय २१), प्रतीक प्रकाश जाधव (वय २३), स्वप्नील मिलिंद मापारे (वय २३), ओंकार संजय जाधव (वय २१), विशाल विलास धुमाळ (वय २८), योगेश नारायण मोहिते (वय २७), बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते ( वय ३०), सोमप्रशांत मधुकर पाटील (वय ४२), सागर कल्याण रजपूत, राकेश गायकवाड ऊर्फ बाब्या बुरजी, तानाजी कदम, निखिल दुगाई, पप्पू ऊर्फ अतुल लक्ष्मण कुडले आणि सचिन ताकवले अशी निर्दोष सुटका केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी संतोष कांबळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी संतोष कांबळे आणि मयत अमोल बधे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. हे दोघे नीलेश घायवळ या गुंडाचे सहकारी व टोळी सदस्य आहेत. नीलेश घायवळ टोळीचे गजा मारणे टोळीशी पूर्ववैमनस्य आहे. अमोल बधेचा २९ नोव्हेंबर २०१४ रोजी नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमी रस्त्यावरील कलावती मंदिराजवळ टोळीयुद्धातून खून झाला होता. पोलिसांनी याप्रकरणात ११ लोखंडी कोयते, ३ गावठी पिस्तुले, १० मोबाईल हँडसेट, २ जिवंत काडतुसे असा इतर साहित्य मिळून ५ लाख ३२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

.....