शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

दुखापत, महिलांच्या छळाच्या गुन्ह्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लॉकडाऊनच्या काळात जवळपास ३ महिने संचारबंदी असल्याने शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लॉकडाऊनच्या काळात जवळपास ३ महिने संचारबंदी असल्याने शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे अनेक गुन्ह्यांच्या प्रकारात २०१९ च्या तुलनेत घट दिसत असताना दुखापत, महिलांच्या छळाच्या गुन्ह्यात मात्र मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यातील गुन्ह्यांचे प्रमाण पाहता वाहनचोरी, घरफोडी, जबरी चोरी असे गुन्हे लॉकडाऊनपूर्वीच्या पातळीवर जाऊन पोहचले आहेत.

२०१९ मध्ये ७४ खुनाच्या घटना घडल्या होत्या. यंदा ७३ खुनाचे प्रकार घडले आहेत़ इतर जबरी चोरीही वाढलेल्या दिसून येत आहेत.

खुनाचा प्रयत्न केल्याचे २० गुन्हे डिसेंबर महिन्यात दाखल झाले आहेत़ गंभीर दुखापत, रस्त्यावरील मारामारीच्या गुन्ह्यात गंभीर कलमे लावण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला होता. त्यानुसार डिसेंबर महिन्यात खुनाचा प्रयत्न केल्याचे २० गुन्हे दाखल आहेत.

लॉकडाऊनच्या काळात इतर गुन्हे कमी झाले तरी कौटुंबिक हिंसाचार वाढले असे सांगितले जात होते़ त्याचे प्रत्यंतर महिलांना क्रुर वागणूक देणे या गुन्ह्याच्या प्रकारात दिसून येते़ २०१९ मध्ये २७२ गुन्ह्यांची नोंद होती़ लॉकडाऊनमध्ये ३ महिने लोकांना बाहेर पडण्याची सोय नव्हती़ असे असले तरी २०२० मध्ये २६२ गुन्हे दाखल झाले आहे़ असा प्रकार दुखापतीच्या गुन्ह्यात दिसून येत आहे.

लॉकडाऊन नंतर इतर क्षेत्रात ‘न्यू नॉर्मल’ कमी अधिक प्रमाणात असले तरी गुन्हेगारीच्या क्षेत्रात ‘न्यू नॉर्मल’ लवकर आले असल्याचे दिसून येत आहे.

.......

गुन्ह्याचा प्रकारडिसेंबर २० अखेरडिसेंबर १९ अखेर

खुन ७३ ७४

खुनाचा प्रयत्न १०८ १२१

दरोडा ५ २०

दरोडा तयारी २८ १४

चैन स्रचिंग ४८ ६४

मोबाईल स्रचिंग ४६ ७५

इतर जबरी चोरी ७६ ८२

घरफोडी ३४० ४६०

गर्दी -मारामारी १५३ १५५

दुखापत ९३८ ९८५

विवाहितेला क्रुर ९३८ ८९५

वागणूक देणे

बलात्कार १६० २२४

विनयभंग २६६ ४१९

अपहरण ४५८ ४४७

फसवणूक ४८५ ९२६

चोरी ५९० १३६७

वाहनचोरी ९६७ १६७८

फेटल १३९ २२०

एनडीपीएस ११८ ११९

जुगारप्रतिबंधक २४३ ४६१

दारुबंदी कायदा १२४० १११९