शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मराठी भाषा संवर्धनासाठी पुढाकार

By admin | Updated: July 25, 2016 02:24 IST

राज्यात विविध ठिकाणी झालेले मराठी भाषिक उपक्रम लेखी स्वरूपात संकलित करण्याचे काम राज्य मराठी विकास संस्थेने हाती घेतले असून, भाषेच्या विकासासाठी विविध

पुणे : राज्यात विविध ठिकाणी झालेले मराठी भाषिक उपक्रम लेखी स्वरूपात संकलित करण्याचे काम राज्य मराठी विकास संस्थेने हाती घेतले असून, भाषेच्या विकासासाठी विविध उपाय सुचविण्याचे आवाहन भाषाप्रेमी मंडळींना केले आहे. सध्या इंग्रजी भाषेच्या बोलबालात मराठीचे अस्तित्व लोप पावत चालले आहे. तिला जिवंत ठेवायचे असेल, तर भाषेसंदर्भात काही पावले उचलली गेली पाहिजेत; मात्र शासन कसे आणि कुठे कमी पडते, याचाच पाढा अनेकदा भाषाप्रेमी मंडळींकडून वाचला जातो. भाषेच्या विकासासाठी ठोस उपाययोजना करणे ही शासनाचीच जबाबदारी आहे, असे गृहीत धरून त्याची पूर्तता करण्याची अपेक्षा केली जाते. त्यात पुन्हा दिरंगाई झाल्यास शासनालाच धारेवर धरले जाते. हे टाळण्यासाठी आता शासनानेच मराठी भाषा संवर्धनासाठी भाषाप्रेमींना ‘साद’ घातली आहे. भाषेच्या उत्कर्षासाठी मराठी शाळांमधील शिक्षक, साहित्यसंस्था, भाषाप्रेमी मंडळी सातत्याने कार्यरत असतात. मराठीला समृद्ध करण्याकरिता त्यांच्याकडे विविध कल्पना असतात. एखादा विशिष्ट उपक्रम सुरू करावा, अशी त्यांची इच्छा असते. त्यांच्या कल्पना आणि उपक्रमांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने संस्थेने ही अभिनव संकल्पना आणली आहे. सर्व कल्पनांचे एकत्रिकीकरण करणे आणि त्याला मूर्त स्वरूप देणे हा त्यामागील विचार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांना सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक आनंद काटीकर यांनी ‘लोकमत’ला दिली. आपल्या उपक्रमाचा आराखडा आणि आपले अनुभव संस्थेच्या rmvs_mumbai@yahoo.com या ई-मेलवर किंवा एल्फिंस्टन तांत्रिक विद्यालय, ३ महापालिका मार्ग, धोबीतलाव मुंबई ४००००१ या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.