शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कोविड संकटात मदतीसाठी ‘बारामती चेंबर’ चा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:11 IST

बारामती : बारामती औद्यौगिक वसाहतीतील अनेक उद्योजक बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज या त्यांच्या शिखर संस्थेच्या माध्यमातून कोविड ...

बारामती : बारामती औद्यौगिक वसाहतीतील अनेक उद्योजक बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज या त्यांच्या शिखर संस्थेच्या माध्यमातून कोविड रुग्णसेवेसाठी विविध स्वरूपाची मदत करण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत.

बारामती चेंबर संचलीत आंत्रप्रुनर क्लबचे सभासदांकडून १०० पल्स आक्सीमिटर, १० थर्मल गन व एक वाटर कुलर बारामती परिसरातील शासकीय रुग्णालयांना देण्यासाठी क्लबचे चेअरमन शहाजी रणनवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्त केले. त्यानंतर पवार यांच्या हस्ते संबंधितांना हे प्रदान करण्यात आले. बारामती कॅटल फिड प्रा.लि. या कंपनीतर्फे २ टनाचे ३ एअर कंडिशनर, ५० फेस शिल्ड, प्रत्येकी १०००० सर्जिकल हेड कॅप, शूज कव्हर, ३ प्लाय मास्क, हँड ग्लोव्हज, ५०० डिसपोजेबल अ‍ॅप्रन, ५० लिटर सॅनिटायझर, १०० नग हँड वॉश असे ५ लाख किंमतीच्या विविध वस्तू आज बारामती कॅटल फिडचे एच . आर. प्रबंधक राहुल जाधव यांनी पवार यांच्या हस्ते मेडिकल कालेज कोविड सेंटर व महिला रुग्णालय यांना प्रदान करण्यात आले. यावेळी आणखी ५ लाख रुपये मेडिकल आक्सिजन प्रकल्पासाठी देण्याचे बारामती कॅटल फीडतर्फे घोषित करणेत आले. मेडिकल ऑक्सिजन जंबो सिलेंडर हाताळण्यासाठी योगीराज ट्रेलर ने बनविलेली ऑक्सिजन ट्रॉलीचेही अनावरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. अशा प्रक़ारच्या २० ट्रॉली विविध शासकीय रुग्णालयांना पुरविणेचे बारामती चेंबरचे अध्यक्ष प्रमोद काकडे यांनी यावेळी जाहिर केले. उद्योजक रमाकांत पाडोळे यांनी त्यांच्या लग्नाचे २५ व्या वाढदिवसानिमित्त २५ हजारां चा धनादेश कोवीड मदत फंडासाठी पवार यांच्याकडे सुपुर्त केला.

या स्तुत्य उपक्रमाबद्दल पवार यांनी बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज चे अध्यक्ष प्रमोद काकडे, बारामती कॅटल फिडचे चेअरमन सचिन माने , आंत्रप्रुनर क्लबचे अध्यक्ष शहाजी रणनवरे आणि योगिराज ट्रेलर चे संचालक अरुण म्हसवडे व रमाकांत पाडोळे यांचे कौतुक केले.

यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, डॉ. सदानंद काळे, डॉ. बापु भोई, डॉ. मनोज खोमणे, संभाजी नाना होळकर, उद्योजक सचिन सातव, बारामती चेंबर चे अध्यक्ष प्रमोद काकडे, कार्याध्यक्ष दत्ता कुंभार, अरुण म्हसवडे, चंद्रकांत नलावडे, राहुल जाधव आदी उपस्थित होते.

—————————————

फोटोओळी—बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज च्या वतीने कोविड रुग्णसेवेसाठी विविध स्वरूपाची मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्त करण्यात आली.

१८०५२०२१ बारामती—०१

——————————————