शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

देशोदेशीच्या तंत्रज्ञानाची मिळणार माहिती

By admin | Updated: January 13, 2017 01:51 IST

बारामतीमध्ये १९ ते २२ जानेवारी दरम्यान दुसरे अंतरराष्ट्रीय कृषिक प्रदर्शन होत आहे. अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट

बारामती : बारामतीमध्ये १९ ते २२ जानेवारी दरम्यान दुसरे अंतरराष्ट्रीय कृषिक प्रदर्शन होत आहे. अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच वतीने शारदानगरमध्ये हे प्रदर्शन पार पडत आहे. यामध्ये नऊ देशांमधील पीक पद्धती शेतकऱ्यांना अभ्यासता येणार आहेत. परदेशात ज्या तंत्रातून पिके घेतली जातात, ती पद्धत येथे प्रत्यक्ष पाहता येणार आहे.या प्रदर्शनात ११० एकरांवर फुलपिके, भाजीपाला, नगदी पिके, फळबागा यांची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. भुसार पिके ठिबक सिंचनावर व आधुनिक खत व पाणी व्यवस्थापनात अधिक प्रभावीपणे येऊ शकतात, हे शेतकऱ्यांना पाहता येईल. या प्रदर्शनात थायलंडमध्ये घेतल्या जाणाऱ्या वेलीवरील फळांच्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक उभारण्यात आले आहे. थायलंडमध्ये खरबुजासारख्या वेलवर्गीय पिकांचे उत्पादनही पॉलीहाऊसमध्ये केले जाते. साहजिकच तेथे रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. तेथील पद्धत बिगरहंगामाच्या काळात आपल्याकडेही फायदेशीर ठरू शकेल. या हेतूने त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे प्रात्यक्षिक उभारण्यात आले आहे. याशिवाय चीनमध्ये लावली जाणारी मका ही एका एकरात ५० क्विंटलपर्यंत उत्पादन देते. त्याची पीक पद्धत येथे दाखवण्यात आली आहे. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना निर्यात कंपन्यांच्या तज्ज्ञांशी थेट संवाद साधता येणार आहे. निर्यात कंपन्यांशी चर्चा करून शेतकरी त्यांच्याशी थेट करारही करू शकतील. या प्रदर्शनात भाजीपाल्याचा नेदरलॅण्ड पॅटर्नही शेतकऱ्यांना अभ्यासता येईल. बेल्जिअमसारख्या देशात माती नव्याने निर्माण करता येत नाही म्हणूुन त्या देशाने माती निर्जंतुकीकरणाचे मॉडेल साधले आहे, तेच मॉडेल येथे वापरले तर पॉलिहाऊसमध्ये ठराविक काळानंतर माती बदलण्याचा जो खर्च येतो, तो कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. याखेरीज कीडरोग नियंत्रणासाठी अत्यल्प खर्चाचे कीडरोग नियंत्रणाचे थायलंड तंत्रज्ञानही येथे पाहावयास मिळणार आहे. त्याचाही वापर जर शेतीमध्ये झाला तर कीडरोग नियंत्रणासाठी वाढत चाललेला खर्च कमी करण्यास मदत होईल. अलीकडे अवकाळी पाऊस, गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षे, डाळिंबांचे अतोनात नुकसान होते. हे टाळण्यासाठी आॅस्ट्रेलियन पद्धतीच्या तंत्राचा वापर झाला तर फळबागांचे संरक्षण होऊन बागा कायमच्या हातातून जाण्याचा धोका कमी होणार आहे. (प्रतिनिधी) आपथराच्या शेतीपासून ते पॉलिटनेलपर्यंत...ल्याकडे राज्यात पाण्याच्या अतिवापराने जमिनी क्षारपड झाल्या आहेत. त्यांचे वाढते प्रमाण जसे चिंतेचे आहे, तसेच मातीचा पोत बिघडत असल्याने पिकाऊ मातीही कमी पडत आहे. दुसरीकडे कुटुंबांची संख्या वाढत असल्याने जमिनीचे तुकडे कमी होत आहेत आणि शहरी भागातही कमी जागेत भाजीपाला पिकवण्याची पध्दत वाढीस लागली आहे.  या साऱ्यांवर उत्तर म्हणून थरांची शेती हा नवा प्रयोग जन्माला येतो आहे. छोटे कंपार्टमेंट करून एकमेकांवर एक असे भाजीपाल्याच्या पिकांचे थर करून उत्पादन घेणारी थरांची शेतीची पद्धत आहे, त्याचीही माहिती शेतकऱ्यांना अभ्यासता येईल.  याखेरीज संरक्षित शेतीमध्ये पिके पूर्णत: कीडरोगापासून दूर ठेवणारी पॉलीटनेल, पॉलीटनेल हाऊस, नाईट ट्रॅप्स, नॉन ओव्हन पॉली प्रॉपिलीन क्रॉप कव्हर, हायड्रोजल तंत्रज्ञानही शेतकऱ्यांना अभ्यासता येऊ शकेल.