शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोवर करप्याचा प्रादुर्भाव

By admin | Updated: January 20, 2016 01:20 IST

इंदापूर तालुक्यामध्ये सध्या पाणीटचाई भेडसावत असतानाच अचानक होणाऱ्या हवामानातील बदलामुळे टोमॅटोच्या पिकावर करपा रोगासह इतर रोगांचाही प्रादुर्भाव होताना दिसत आहे

निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यामध्ये सध्या पाणीटचाई भेडसावत असतानाच अचानक होणाऱ्या हवामानातील बदलामुळे टोमॅटोच्या पिकावर करपा रोगासह इतर रोगांचाही प्रादुर्भाव होताना दिसत आहे. या भयानक अवस्थेत बाजारभावही समाधानकारक मिळत नसल्याने या भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. इंदापूर तालुक्यामध्ये डाळिंबपिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणवर वाढले आहे. टोमॅटो, ढोबळी मिरची, कांदा, ऊस, ज्वारी मका यासारखी पिके घेतली जातात. यामध्ये टोमॅटोपिकाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, कमी कालावधीमध्ये समाधानकारक उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून या पिकाकडे शेतकरी पाहतात. या भागातील शेतकऱ्यांनी यापूर्वी टोमॅटोपिकापासून लाखो रुपयाचे उत्पन्न मिळविल्याची उदाहरणे या भागात पाहायला मिळतात; परंतु सद्य:स्थितीमध्ये टोमॅटोशेती धोक्यात आल्याचे चित्रा दिसत आहे.निमगाव केतकी (ता. इंदापूर) परिसरात अनेक शेतकरी टोमॅटोची शेती करतात. या पिकाची लागवड करताना शेतीची मशागत करणे, शेतीमध्ये खत टाकणे, बेड सोडणे, मल्चिंग पेपर बसविणे, ठिबक सिंचन करणे, रोपांची लागवड करणे, विविध औषधांची फवारणी व विविध खतांचा ठिबकमधून दिला जाणारा डोस यांसाठी एकरी जवळपास ६० ते ७० हजारांपर्यंत खर्च करावा लागतो. मात्र, या पिकाला योग्य बाजारभाव मिळाला नाही, तर शेतकरी कर्जबाजारी होतो. बाजारभाव पडलेल्या काळात अनेकदा शेतकऱ्यांना विक्रीयोग्य झालेले टोमॅटो बांधावर टाकून द्यावे लागतात. यामुळे पिकासाठी केलेला खर्चही निघत नाही. आजही टोमॅटोपिकाला समाधानकारक बाजार मिळत नसल्याचे चित्र आहे. पिकाच्या उत्पादनखर्चाच्या तुलनेत बाजार मिळत नाही; त्यामुळे या भागातील टोमॅटो उत्पादक शेतकरी आडचणीत आल्याचे दिसत आहे.