शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंड विठ्ठल शेलार भाजपाच्या आश्रयाला

By admin | Updated: January 11, 2017 02:32 IST

मुळशीतील गुन्हेगारी जगतात दहा वर्षांपासून सक्रिय असलेला तसेच खंडणी, दंगा-दुखापत करणे, अपहरण, दरोड्याची तयारी

 पुणे : मुळशीतील गुन्हेगारी जगतात दहा वर्षांपासून सक्रिय असलेला तसेच खंडणी, दंगा-दुखापत करणे, अपहरण, दरोड्याची तयारी, हाफ मर्डर, खून यासारख्या गुन्ह्यांत अडकल्याने प्रशासनाकडून सन २०१४मध्ये मोक्काखाली कारवाई झालेला आणि सध्या जामिनावर सुटलेला मुळशीतील कुख्यात गुंड विठ्ठल शेलार याने पिरंगुट येथे भाजपामध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेशही खुद्द पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट व आमदार बाळा भेगडे, माजी आमदार शरद ढमाले यांच्या उपस्थितीत झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शेलार याने भाजपात प्रवेश केला व त्याला लागलीच पक्षाचे भोर- मुळशी- वेल्ह्याचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. मुळशीतील भालवडी गावात त्याचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम जाहीर झाला. पक्षप्रवेश सोहा भालवडी गावात पार पडला. यावेळी शेलार टोळीतील गुंडही उपस्थित होते. माऩ्यवरांसमवेत काढलेली छायाचित्रे शेलारने फेसबुकवरही टाकली आहेत. चार महिन्यांपूर्वीच जामिनावर सुटून आल्यानंतर विठ्ठल शेलार आपल्या माण येथील एका मित्राच्या वाढदिवसाच्या वेळी उपस्थित असताना त्याने विनापरवाना शस्त्र बाळगल्याच्या कारणावरून त्याला पोलिसांनी छापा टाकून अटक केली होती. त्यानंतरही तो जामिनावर सुटून आला होता. मूळचा बोतरवाडी (ता. मुळशी) येथील रहिवासी असलेला विठ्ठल शेलार याने मारणे टोळीशी संघर्ष करून अल्पावधीतच मुळशीत आपला दबदबा निर्माण केला होता.  मुळशी तालुका व शहर पोलीस चौकीला शेलार याच्या नावावर पिंटू मारणे याच्या खुनासह अन्य दोन खुनांबरोबरच इतरही अनेक गुन्हे असताना स्वत:ला सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या भाजपाने शेलार याला पक्षात प्रवेश दिल्याने तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बेकायदेशीररीत्या जमिनींचा  कब्जा घेत असल्याची तक्रार त्याच्या टोळीविषयी आहे.