शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कुख्यात घरफोड्या तांदळेच्या टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 01:04 IST

चाकण पोलिसांची कारवाई : खेडचे जेल तोडून झाला होता फरार; तीस जबरी चोऱ्या

चाकण : खेड येथील पोलीस कोठडीत असताना जेल तोडून फरार झालेला; तसेच तीस जबरी चोºया, घरफोड्या व वाहनचोरी करणाºया विशाल तांदळेसह त्याच्या तीन जणांच्या टोळीस चाकण पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून एक दरोडा, चार जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या कामगिरीबद्दल पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी चाकण पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : विशाल दत्तात्रय तांदळे (वय २२, रा. बैलबाजार रोड, मंचर, ता. आंबेगाव, जि.पुणे ), गणेश भास्कर वाबळे (वय १८, रा. भेंडेमळा, मंचर, ता. आंबेगाव) व आरिफ अस्लम नाईकवाडे (वय २१, रा. संभाजीनगर, मंचर, ता. आंबेगाव) या तिघांना रविवारी दि. १३ रोजी रात्री २ च्या सुमारास अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी विशाल तांदळे हा २० आॅक्टोबर २०१८ रोजी खेड पोलीस ठाण्याचे जेल तोडून फरार झाला होता. त्याच्या सोबत जेलमधून फरार झालेला आरोपी राहुल गोयेकर याचा नगर जिल्ह्यात खून झाला होता.

याबाबत अधिक माहिती अशी : दि. १२ जानेवारी २०१९ रोजी वाघजाईनगर येथील चाकण-तळेगाव रोड वरील पाण्याच्या टाकीजवळ फिर्यादी राजकुमार प्रजापती यांच्या बोलेरो गाडीला (एमएच १४ एसी ६९२३) स्विफ्ट डिझायर कार (एमएच १४ डीएक्स ८७८५) ही गाडी आडवी मारून त्यामधील अनोळखी इसमांनी फिर्यादी व साक्षीदार यांचे रोख रक्कम सहा हजार रुपये, दोन मोबाईल,  बोलेरो गाडी असा ऐवज, लोखंडी कोयता व चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकून चोरून नेले होते.त्या अनुषंगाने एचपी पेट्रोलपंप सावरदरी या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.सदरची कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्तस्मार्तना पाटील, पोलीस आयुक्त चंद्रकांत आलसटवार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, विजय जगदाळे, पोलीस हवालदार पप्पू हिंगे, स्वामी, पोलीस नाईक सोनवणे, जरे, गोरड, राळे, भाम्बुरे, गायकवाड यांच्या पथकाने केली.पोलिसांनी केली नाकाबंदीसावरदरी येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस नाईक कांबळे, सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल वरपे यांच्या पथकाने नाकाबंदी केली होती. यावेळी नाकाबंदी चालू असताना एका स्विफ्ट गाडीचा संशय आल्याने थांबवण्याचा इशारा केला असता गाडीतील इसम गाडी जागेवर सोडून पळण्याच्या प्रयत्न करत होते.४यावेळी पोलीस पथकाने त्यांच्यावर झडप घालून तिन्ही आरोपीस ताब्यात घेतले. त्यातील आणखी दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दोन दरोडा, चार जबरी चोरी केल्याचे कबूल केले आहे. त्यांच्यावर नाशिक, अमरावती, अहमदनगर, बीड इत्यादी ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संजय निलपत्रेवार हे अधिक तपास करीत आहेत.