पिंपरी : उद्योगनगरीतील रहिवाशांनी सढळ हाताने खरेदी केल्याने या वर्षी बाजारात विक्रेत्यांचीही दिवाळी झाल्याचे चित्र दिसून आले. वाहन, सराफा, कापड, गृहखरेदी, किराणा, भूसार, इलेक्टॉनिक, शोभिवंत वस्तूंच्या क्षेत्रंमध्ये अंदाजे 4क्क् कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
बोनस आणि पूर्वनियोजन म्हणून गाठीस ठेवलेला पैसा यामुळे बहुतेक शहरवासियांनी या वर्षीची दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याचा संकल्प केल्याचीच प्रचिती येत होती. शहरवासीयांच्या क्रयशक्तीत वाढ झाल्याचे बाजारपेठांमधील गर्दी आणि खरेदीवरुन जाणवत होते. सर्वच क्षेत्रंमध्ये खरेदीचा जोर कायम होता. नुकत्याच झालेल्या निवडणूकांमुळे कार्यकत्र्यामधील उत्साह यामुळे खरेदीस कुटुंबियांसाठी हात ढीले सोडण्याची सवलत त्यांच्याकडून दिली गेली. चांगले हवामानही खरेदीचा उत्साह वाढविणारे ठरले. यावर्षी दिवाळीच्या मुख्य 5 दिवसांमध्ये खरेदीसाठी बाहेर पडणा:या नागरिकांना पावसाचे कोणतेच विघ्न आले नाही. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात नागरिकांना घराबाहेर पडता आले . अनेकांनी शक्य तितकी अधिकाधिक खरेदी करीत कुटुंबियांना समाधानी करण्याला प्राधान्य दिल्याचे दिसले. त्यामुळे बाजारातील उलाढाल सुमारे 4क्क् कोटींर्पयत झाली. घडय़ाळ, घरघुती सजावटीच्या वस्तू, भेटवस्तू, मिठाई, सुकामेवा, भेटकार्ड, देवपूजा साहित्य आदी क्षेत्रतही पंधरा कोटींपेक्षा जादाची उलाढाल झाल्याचे व्यापा:यांनी सांगीतले.
(प्रतिनिधी)
धूम स्टाईल दुचाकी
4शहरात विशेषत: चिंचवड, केएसबी चौक, कासारवाडी, थेरगाव, दापोडी या भागात दूचाकीच्या सूमारे 3क् शोरुम आहेत. त्यामध्ये खास दिवाळीच्या मुहूर्तावर 14क्क् हून अधिक वाहनांची विक्री झाली असून त्यापोटी 9 कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे. विशेषत: विद्याथ्र्याची 9क् हजार ते दीड लाख रुपये किंमतीच्या धूमस्टाईल स्पोर्ट्स बाईक खरेदीस पसंती राहिली. स्वपAातली दूचाकी खरेदी करण्याची इच्छा साकार केली.
फटाक्यांचे स्टॉल रिकामे
4दिवाळी पाडव्यार्पयत राजकीय, आर्थिक तसेच हवामानाचे वातावरण उत्साहपूर्णच राहिल्याने उत्साह फटाक्यांच्या रुपाने बाहेर आल्याचे दिसले. शहरात कायमस्वरुपी फटाका विक्रत्यांबरोबरच 95 जणांनी पक्कया बांधकामात दूकाने सुरु केली. शहरातील चौकाचौकात व मुख्य रस्त्यांलगत 3क्क् जणांनी तात्पुरती फटाकाविक्री दूकाने थाटली. विक्रमी मागणीने फटाके विकले गेल्याने बहुतेक दुकाने खाली झाल्याने ग्राहकांना दुसरी दुकाने शोधण्याची वेळ आली.
इलेक्ट्रॉनिक बाजाराला तुलनेने कमी प्रतिसाद
4या वर्षी दिवाळीला इलेक्टॉनिक वस्तू खरेदीसाठी इतर क्षेत्रंपेक्षा तुलनेने कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. हिवाळा जवळ येत असल्याने शक्यतो थंडावा देणा:या फ्रिज, एसी या उपकरणाचा बाजार थंडच राहिला. नव्याने दाखल झालेल्या व तुलनेने 2 ते 4 हजार रुपयांत मिळणा:या हिटरला मागणी राहिली. अॅन्ड्रॉईड मोबाईल, लॅपटॉप, कॅमेरा, टिव्ही, ओव्हण, सॅन्डविच मेकर, ब्लेन्डर अशा वस्तूंना चांगली मागणी राहिली.
तयार कपडय़ांसाठी मोजले 1 लाख
4सर्वाधिक खरेदी कापडविक्रीच्या क्षेत्रत झाल्याचे निदर्शनास आले. मोलमजूरी करणारा मजूरअड्डय़ावरील कामगार असो अथवा आलिशान जीवनशैली जगणारे नागरिक प्रत्येकानेच या आनंदाच्या सणाला सर्व कुटुंबियांसाठी यथाशक्ती खरेदी केली. े लहानग्यांच्या शंभर रुपयांच्या कपडय़ांपासून ते मोठय़ांच्या उंची वीस हजार रुपयार्पयतच्या कपडय़ांची खरेदी करण्यात आली. काहीजणांनी तर आपल्या आवडीच्या माणसासाठी खास तयार करवून घेतलेल्या कपडय़ांसाठी 5क् हजार ते 1 लाख रुपये देखील मोजल्याची माहिती व्यापा:यांनी दिली. शहरात पंधराशेच्यावर लहानमोठी कापड दूकाने आहेत. नामांकीत कंपन्यांची शोरुम आहेत.बडय़ा मॉल्समध्येही कापड खरेदी होते. यामुळे कपडय़ांचा व्यापार 6क् कोटींच्या वर गेल्याचा अंदाज आहे.
किराणा व भुसार बाजारात तेजी
4दिवाळीमुळे किराणा व भूसार बाजारात गेल्या आठवडाभरात चांगलीच तेजी राहिली. शहरात 8क्क् च्या वर किराणा व भूसार मालाची दुकाने आहेत. एकटय़ा पिंपरी कॅम्पात घाऊक बाजारभावाने विक्री करणारी 6क् हून अधिक दूकाने आहेत. शहरभरात या क्षेत्रत दिवाळीदरम्यान 2क् कोटीपेक्षा जादा खरेदी झाली.
सोने घटल्याने खरेदी वाढली
4मागील 2 वर्षांच्या तुलनेत या वर्षी ऐन दिवाळीतच सोने व चांदीच्या दरामध्ये घट राहिली. आठवडाभरात 24 कॅरेट सोन्याचा दर 27 हजाराच्या आसपास राहिला. भाऊबिजेच्या दिवसार्पयत (शनिवारी) हा दर 27,46क् रुपये राहिला. चांदीचा दरही प्रतिकीलोस 4क्,2क्क् रुपये दर राहिला. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी गुंतवणूक म्हणून सोने चांदी खरेदी करण्याला पसंती दिली. त्यामुळे सर्वच सराफी पेढय़ांमध्ये 24 कॅरेटचे सोन्याचे वेढे, नाणी, थेट चांदी तसेच कमोडिटी बाजारातील सोने, चांदीचे भाग खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी राहिली. तयार दागिन्यांच्या खरेदीचा उत्साहही मोठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीमध्ये 1क् टक्के वाढ झाल्याने या बाजारातील व्यवहार 1क् कोटींच्या पुढे राहिला.
दस्तनोंदणीसाठी झुंबड
4निवडणूकीच्या आचारसंहितेने रोडावलेल्या बांधकाम क्षेत्रतील दस्तनोंदणीला सोमवारपासून चांगलीच घुंबड उडाल्याचे दिसले. शुक्रवार्पयत शहरातील चिंचवड, पिंपरी, भोसरी, कासारवाडी येथील महसुल विभागाच्या कार्यालयांमध्ये 7क्क् हून अधिक दस्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे 2क्क् कोटींहून अधिक मालमत्तांची खरेदी - विक्री झाली आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर घेत गृहप्रवेश केला.
बहिणीसाठी अनोखी ओवाळणी
4नोकरी करणा:या अनेक भावांनी महाविद्यालयात शिकणा:या आपल्या बहिणीसाठी भाऊबीजेची ओवाळणी म्हणून दुचाकीची भेट दिली. बहिणीकरीता 45 ते 75 हजार रुपयांदरम्यान असणा:या अशा दुचाकी खरेदी करण्याकडे कल राहिला. तसेच गृहपयोगी महागडय़ा वस्तूही भेट दिल्या. साडय़ा, सोन्या चांदीचे दागिने ही भेट दिले. भाऊबीजेनिमित्त अनेक हॉटेलमध्ये मेजवानी दिली. तसेच शहरातील बसस्थानाकवरही प्रवाशांची गर्दी दिसत होती. काही जणींना माहेरी जाण्याची ओढ होती.
आलिशान मोटारीतून कुटुंबाला सफर
4आता आलिशान मोटारींची हौस वाढू लागली आहे. शहर परिसरात अनेक उद्योजकांनी घरोबा केला आहे. त्याचबरोबर मालमत्तांच्या व्यवहारातून अर्थकारण सुधारलेल्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशा लोकांनी शहरातून तसेच शहराबाहेरील शोरुम मधून आलिशान मोटारी खरेदी करण्याला पसंती दिल्याचे दिवाळीत दिसले. 5 ते 7 लाखांची मोटार खरेदी करणा:या अनेकांनी आता चक्क 5क् ते 8क् लाख रुपये किंमतीच्या आलिशान मोटारी लक्ष्मीपूजनाच्या मूहूर्तावर दारापूढे आणल्या. त्यासाठी पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आदी भागातील शोरुममध्ये एकून 12क् हून अधिक मोटारी विकल्या गेल्या. शहराबाहूरुन 2क् हून अधिक आलिशान मोटारी खरेदी झाल्या असून त्यापोटी 4क् कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.