शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरी होतेय गुन्हेगारनगरी

By admin | Updated: July 8, 2016 04:04 IST

शहरात गुन्हेगारांच्या नवनवीन टोळ्या निर्माण होत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत परिमंडळ तीनच्या हद्दीत २२ खुनाच्या घटना घडल्या

- सचिन देव, पिंपरी

शहरात गुन्हेगारांच्या नवनवीन टोळ्या निर्माण होत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत परिमंडळ तीनच्या हद्दीत २२ खुनाच्या घटना घडल्या आहेत, तर खुनाचा प्रयत्न करणाऱ्या ४२ घटना घडल्या. यामध्ये सर्वाधिक खून पिंपरीत ५, हिंजवडीत ५ आणि वाकड व निगडीत प्रत्येकी तीन खुनाच्या घटनांची नोंद पोलीस दप्तरी आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी पिंपरी पोलीस ठाण्याशेजारीच एका युवकाचा कारणावरून दहा ते बारा जणांच्या टोळ्क्यांनी खून केला. थेट दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांचा वचक संपला असून, गुन्हेगारांची दहशत वाढल्याची शहरात जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर पुन्हा पिंपरीतच मिलिंदनगरात चार जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केला . यानंतर मागील आठवड्यात सांगवी येथे तीन जणांनी एका युवकाला रात्री साडेअकराला रस्त्यात अडवून कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि आता दोन दिवसांपूर्वीच पुन्हा चिंचवड येथे पादचाऱ्यांना लुटण्याचा प्रकारही घडला असून, या घटनेची नोंद अद्याप पोलीस ठाण्यात झालेली नाही. या घटनांचा आलेख दिवसागणिक वाढत असून, गेल्या सहा महिन्यांत परिमंडळ तीनच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी, निगडी, चिंचवड, एमआयडीसी, चतु:शृंगी, हिंजवडी, सांगवी, वाकड या पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत २२ खुनाच्या घटना घडल्या आहेत. खुनाचा प्रयत्न करण्याच्याहीं घटना हिंजवडी, वाकड आणि निगडी येथे प्रत्येकी ६ घटना घडल्या आहेत. अशा प्रकारे या गंभीर गुन्ह्यांचे प्रकार शहरात दिवसेंदिवस वाढत असताना घरफोडी, सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी, रस्त्यात अडवून लूट करणे या घटनांचे प्रमाणही दिवसागणिक वाढत आहे. चार दिवसांपूर्वीच नेहरुनगरमध्ये दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका पादचारी महिलेची सोनसाखळी लंपास केल्याची घटना घडली. तर दोन दिवसांपूर्वीच सोमवारी (दि. ४) रात्री भोसरी येथे चोरट्यांनी वाइन्स शॉपचे दुकान फोडून साडेतीन लाखांची रोकड लंपास केली आहे. दरम्यान , दुचाकी चोरीच्या घटनांचा क्रम तर नित्याचाच झाला असून, दर दिवसाआड पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांची नोंद होत आहेत. दुचाकी चोरीच्या घटनांचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही बोटावर मोजण्या इतकेच आहे. गुन्ह्यांमध्ये युवक आघाडीवर शहरात घडलेल्या मागील खुनाच्या घटना, तोडफोडीचे प्रकार आणि घरफोडीच्या घटनांमध्ये अटक केलेल्या आरोपींपैकी बहुतांश आरोपी हे सोळा ते पंचवीस वयोगटातील आहेत. यामध्ये काही सराईत गुन्हेगार असून, काही युवक हे गुन्हेगारीची पार्श्वभूमी नसतानाही दहशत माजविण्यासाठी अशा प्रकारचे कृत्य करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तर दुचाकी चोरी व सोनसाखळी चोरीच्या घटनांमधील अटक केलेल्या चोरट्यांमध्येही बहुतांश चोरटे हे अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. तर काही चोरटेही नवनवीन टोळ्यांमध्ये काम करत असल्याचे समोर आल्याने यावर नियंत्रण मिळवणे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या खुनाच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांसह युवकांचा समावेश आढळून आल्याने, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. पोलिसांतर्फे या गुन्हेगारांवर कारवाई केली जाते. मात्र, आई -वडिलांनीही या गोष्टीचा गंभीर विचार केला पाहिजे. अठरा ते पंचवीस हा करिअर घडविण्याचा कालावधी असल्याने, युवकांचे यांकडे लक्ष नसून किरकोळ कारणावरून खुना सारख्या घटना युवकांच्या हातून घडत आहेत. याकरिता आई-वडिलांनी आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत, त्याला काही व्यसन आहे का, तो शाळेत जातो का, यांकडे लक्ष देऊन, त्याला दुष्परिणामांची जाणीव करून दिली पाहिजे. शहरातील सामाजिक संस्थानींही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तरच सुसंस्कृत युवक तयार होतील. - पी. आर. पाटील, उपायुक्त, गुन्हे शाखा, पुणे