शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटरच्या मदतीला धावले औद्योगिक कारखाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:11 IST

इंडस्ट्रियल मेटल पावडर व आर्सेलर मित्तल अँड निपॉन स्टील या कारखान्यांनी औषधे व इतर साहित्य भेट दिली. गेल्या महिनाभपासून ...

इंडस्ट्रियल मेटल पावडर व आर्सेलर मित्तल अँड निपॉन स्टील या कारखान्यांनी औषधे व इतर साहित्य भेट दिली.

गेल्या महिनाभपासून पिंपळे जगताप याठिकाणी श्री क्षेत्र वढू बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी आमदार अ‍ॅड. अशोक पवार व जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड केअर सेंटरची पिंपळे जगताप येथील मयुरी लॉन्स या मंगल कार्यालयात निर्मिती केली. या सेंटरमधून औषधोपचारातून बरे झालेल्या रुग्णाला वृक्ष भेट देण्याचा सामाजिक उपक्रमही सुरू करण्यात आला आहे.

ज्या रुग्णांना बाहेरील औषध द्यावयाची असतात, अशा रुग्णांना प्रफुल्ल शिवले स्वत: औषधे देत असतात. ही गरज ओळखून परिसरातील इंडस्ट्रियल मेटल पावडर (आयएमपी) या कारखान्याच्यावतीने कारखान्याचे प्रकाश धोका यांनी बहुतांश औषधे कोविड केअर सेंटरला भेट दिली. याचेच अनुकरण करत आर्सेलर मित्तल अँड निपॉन स्टील या कारखान्याच्या वतीने याठिकाणी काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक यांच्यासाठी ग्लोज व मास्क उपलब्ध करून दिले आहे. यावेळी प्रफुल्ल शिवले यांच्या समवेत अंकुश शिवले, संदीप शिवले, प्रसाद शिवले, गणेश कर्डिले, लक्ष्मण शिवले, अक्षय शिवले, विठ्ठल शिवले आदी उपस्थित होते.

--

चौकट

सीटी स्कॅन आता दीड हजारात

पिंपळे जगताप (चौफुला) व शिक्रापूर येथे ३०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना सीटीस्कॅनची गरज असते व सध्याच्या काळातील आर्थिक मंदीमुळे हे दर रुग्णांना परवडणारे नसल्याने आमदार अ‍ॅड. अशोक पवार चौफुला कोविड सेंटरचे चालक प्रफुल्ल शिवले यांच्या समवेत सूर्या हॉस्पिटलचे डॉ. रवींद्र टेमगिरे यांची भेट घेत आमदार पवार यांनी सीटीस्कॅनचे दर कमी करण्याची सूचना करताच सर्व कोविड रुग्णांसाठी सीटीस्कॅनचे दर प्रती रुग्णांना दीड हजार केल्याने येथील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

--

फोटो क्रमांक - २२ कोरोगाव भीमा कोरोना सेंटर

फोटोओळी : चौफुला (ता. शिरूर) येथील कोविड केअर सेंटरमध्ये इंडस्ट्रिअल मेटल पावडर व आर्सेलर मित्तल अँड निपॉन स्टील या कारखान्यांनी औषधे व इतर साहित्य प्रफुल्ल शिवले यांच्याकडे भेट दिली.