शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणी प्रदूषणमुक्तीच्या मार्गावर

By admin | Updated: May 7, 2017 03:08 IST

अलंकापुरीचे वैभव आणि वारकरी बांधवांमध्ये पवित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीची प्रदूषणाच्या

 लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी/शेलपिंपळगाव : अलंकापुरीचे वैभव आणि वारकरी बांधवांमध्ये पवित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीची प्रदूषणाच्या विळख्यात सुटका करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष आरखडा तयार करण्यात येणार असून त्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. लोकमतने ‘इंद्रायणी प्रदूषणाच्या विळख्यात’ अशी वृत्तमालिका दिली होती. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. आगामी काळात आळंदीकरांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होईल अशी आशा निर्माण झाली आहे. तळवडे, चिखली, जाधववाडी, मोशी, चऱ्होली, डुडूळगाव आदी भागातील नाले आणि औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून निर्माण होणारे सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडले जाते. तसेच मानवी मैलामिश्रित सांडपाणीही प्रक्रिया न करता नदीपत्रात सोडले जाते.परिणामी इंद्रायणी प्रचंड प्रदूषित झाली आहे. यावर प्रभावी तोडगा काढण्यासाठी आणि नदीसुधार प्रकल्प हाती घेण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नदीची सध्य:स्थिती पाहावी. त्याआधारे ठोस कार्यवाही करावी अशी मागणी आळंदीकरांनी आमदार महेश लांडगे यांना निवेदनाद्वारे केली होती. त्यापार्श्वभूमीवर शनिवारी आयुक्त हार्डीकर, आमदार महेश  लांडगे यांनी महापालिका  हद्दीतील इंद्रायणी नदीपात्र, आळंदीतील बंधारा व जलवाहिन्यांची पाहणी केली.महापौर नितीन काळजे, आळंदी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, पर्यावरण विभागचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी,  शहरसह अभियंता दुधेकर, कार्यकारी अभियंता संजय भोसले, पाणीपुरवठा विभागाचे प्रवीण लडकत उपस्थित होते.आळंदी नगर परिषद इंद्रायणीतील प्रदूषित झालेले १० एमएलडी पाणी नागरिकांसाठी उपयोगात आणते. मात्र, त्या पाण्यावर योग्य प्रक्रिया होत नसल्याने आळंदीकरांना पिण्यासाठी दूषित पाणीपुरवठा होत आहे. परिणामी आळंदीतील नागरी आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.सीएसआरमधून नदी संवर्धनइंद्रायणी नदीच्या दुतर्फा पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चाकण हद्दीतील औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत. सीएसआरच्या माध्यमातून इंद्रायणी नदीच्या दुतर्फा असलेल्या कंपन्यांना खर्च करावा लागणार आहे. त्याद्वारे रिव्हर डेव्हलपमेंट फंड उभा केला जाईल.मैलाशुद्धीकरण प्रकल्प उभारणारज्या-ज्या ठिकाणी मैलामिश्रित पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. अशा सर्व ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी मैलाशुद्धीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्याद्वारे नदीपात्रात सोडल्या जाणा-या प्रदूषित पाण्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणता येईल. त्याबाबत महापालिका स्तरावर लवकरच योग्य ती कार्यवाही करुन निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. - श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका