शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

भारत-इस्राईल संबंध आणखी दृढ व्हावेत

By admin | Updated: June 23, 2017 04:57 IST

भारत आणि इस्राईल हे दोन्ही देश एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे भविष्यात या दोन्ही देशांनी आपले संबंध आणखी दृढ करावेत, अशी अपेक्षा इस्राईलचे भारतातील

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भारत आणि इस्राईल हे दोन्ही देश एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे भविष्यात या दोन्ही देशांनी आपले संबंध आणखी दृढ करावेत, अशी अपेक्षा इस्राईलचे भारतातील राजदूत डॅनियल कारमॉन यांनी व्यक्त केली. भारत-इस्राईल या दोन देशांतील संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने ‘भारत-इस्राईल, २५ वर्षीय संबंधांचा आढावा आणि भविष्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.पुणे इंटरनॅशनल सेंटरचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, विश्वस्त प्रमोद चौधरी, इस्राईलचे काउंसल जनरल डेव्हिड अ‍ॅकॉफ, पीआयसीचे मानद संचालक प्रशांत गिरबने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.कारमॉन म्हणाले, ‘सुरुवातीला दोन्ही देशातील संबंध हे सामरिकदृष्ट्या जास्त महत्त्वाचे होते. मात्र, गेल्या काही वर्षांत शेती, व्यापार, शैक्षणिक संबंध, सायबरसुरक्षा, तंत्रज्ञान, आरोग्य, उद्योजकता आणि अन्नसुरक्षा आदी क्षेत्रांतही ते मोठ्या प्रमाणात प्रस्थापित होताना पाहायला मिळत आहेत. नजीकच्या भविष्यात हेच विषय घेत हे संबंध आणखी वाढविण्याचा प्रयत्न इस्राईल सरकार करणार असून भारत सरकारही त्याला सकारात्मक प्रतिसाद देईल, असा आमचा विश्वास आहे.’‘इस्राईलमध्ये शिकत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची टक्केवारी ही तब्बल १० टक्के इतकी आहे. येत्या काही आठवड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्राईलला भेट देणार आहेत. या भेटीत पुन्हा या दोन्ही देशांचे संबंध आणखी वाढतील, अशी आशा असल्याचेही त्यांनी नमूद केले.