लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मराठ्यांचा लढा हा नेहमीच भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी झालेला लढा आहे. हीच परंपरा अजूनही सुरू आहे. भारताचे तुकडे करणे, हे शत्रूराष्ट्राचे धोरणच असून त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी जातीपातींमध्ये न अडकता एकसंध भारताची निर्मिती करणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधकारी यांनी केले.धायरी येथे आयोजित छत्रपती संभाजीमहाराज व्याख्यानमालेत धर्माधिकारी यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र नेहमीच देशासाठी लढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या या मार्गावरून आपण चालले पाहिजे. शत्रू राष्ट्राला आपल्या देशाचे अनेक तुकडे करायचे आहे. त्यांना नामोहरम करणे शक्य आहे, मात्र त्यासाठी एकत्र राहिले पाहिजे. ही प्रेरणा छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम महाराजांनी दिली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले’’. कार्यक्रमाचे संयोजक प्राज भिलारे यांनी केले.
एकसंध भारताची निर्मिती महत्त्वाची
By admin | Updated: May 10, 2017 04:21 IST