शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

भारतीयांचा दमदार प्रारंभ

By admin | Updated: February 20, 2017 03:27 IST

बांगलादेशाची राजधानी ढाका येथे सुरू असलेल्या विश्चषक रोलबॉल स्पर्धेत भारताच्या महिला तसेच पुरूष संघांनी अपेक्षेनुसार दमदार प्रारंभ केला

पुणे : बांगलादेशाची राजधानी ढाका येथे सुरू असलेल्या विश्चषक रोलबॉल स्पर्धेत भारताच्या महिला तसेच पुरूष संघांनी अपेक्षेनुसार दमदार प्रारंभ केला. महिला संघाने सिरीयाला २२-०ने लोळविले, तर पुरूष संघाने प्रथम ओमानवर १०-०ने आणि दुसऱ्या लढतीत आयव्हरी कोस्टवर ९-४ने मात केली. शेख रसूल रोलबॉल स्टेडियम येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत महिला गटातील आपल्या पहिल्या लढतीत सिरीयाविरूद्ध भारताची कर्णधार ऐश्वर्या सावंतने शानदार कामगिरीसह ५ गोल केले. के. कृतिकाने ३ तर श्वेता कदम, सुस्मिता, क्रितिका चौहान, रिंकू सोनीने, अनिशा नायर, अंजली नायर यांनी प्रत्येकी २ गोल करीत विजयामध्ये योगदान दिले. पुरुषांच्या गटातील पहिल्या लढतीत झालेल्या लढतीमध्ये मिहीर साने याने ३, तर कर्णधार आदित्य गणेशवाडे व रोहन दाभाडे यांनी प्रत्येकी २ गोल करीत विजयात निर्णायक योगदान दिले. शुभम शेवते, हरेश्वरसिंग आणि ओम शिव ओम यांनीही प्र्रत्येकी १ गोल केला. दुसऱ्या सामन्यात आयव्हरी कोस्ट संघाने उत्तरार्धात केलेला प्रतिकार भारतीय खेळाडूंनी थिटा ठरविला. ओम शिव ओम आणि हितेश्वरसिंग यांनी प्रत्येकी २ गोल करीत ६ मिनिटांच्या आत भारताला ४-०ने आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात विजयी संघ ५-०ने आघाडीवर होता. उत्तरार्धात कर्णधार आदित्य गणेशवाडेने सलग ३, तर मिहीर साने याने १ गोल करीत भारताची आघाडी ९-१अशी वाढविली. आयव्हरी कोस्टच्या खेळाडूंनी ६ मिनिटांच्या आत ३ गोल करून सामन्यात थोडी रंगत आणली. मात्र, ते भारताला विजयापासून राखू शकले नाही. (क्रीडा प्रतिनिधी)निकालमहिला : भारत : २२ (ऐश्वर्या सावंत ५, के. कृतिका ३, श्वेता कदम, सुस्मिता, क्रितिका चव्हाण, रिंकू सोनी, अनिशा नायर, अंजली नायर प्रत्येकी २ गोल) विवि सिरीया : ०.पुरूष : भारत : १० (मिहीर साने ३, आदित्य गणेशवाडे २, रोहन दाभाडे २, शुभम शेवते १, हरेश्वरसिंग १, ओम शिव ओम १) विवि ओमान : ०.भारत : ९ (आदित्य गणेशवाडे ३, ओम शिव ओम २, हरेश्वरसिंग २, सी. आर. फिलीप १, मिहीर साने १) विवि आयव्हरी कोस्ट : ४ (कौडिओ क्रायरिल ४).