शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बहुराष्ट्रीय कंपन्यांचा भारत केवळ ‘ग्राहक’ : नरेंद्र जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 03:19 IST

‘लिस्ट इन इंडिया- एफडीआय २.० च्या दिशेने’चे प्रकाशन गुंतवणुकीचे जाळे विस्तारले

पुणे : जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्या विविध सेवांच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत आहेत; मात्र आपण केवळ या कंपन्यांचे ग्राहक बनत आहोत. स्थानिक कंपन्यांना या गुंतवणुकींचा फारसा फायदा मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे चीनप्रमाणेच भारतीय गुंतवणूकदारांना बहुराष्ट्रीय कंपन्यांचे समभाग विकत घेण्याची संधी मिळणे काळाची गरज बनली असल्याचे मत राज्यसभेचे खासदार व संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने उमेश कुडाळकर लिखित ‘लिस्ट इन इंडिया- एफडीआय २.० च्या दिशेने’ या संशोधनात्मक प्रबंधाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पीआयसीचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, मानस संचालक प्रशांत गिरबाने आणि लेखक उमेश कुडाळकर उपस्थित होते.जाधव म्हणाले की, जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी इंटरनेट, त्यांचे उत्पादन आणि विविध सेवांमुळे भारतात परदेशी गुंतवणुकीचे जाळे विस्तारले आहे. गेल्या पाच वर्षांत चीनच्या नऊ आणि ११ अमेरिकन कंपन्यांचा त्यात समावेश आहे. आपण फक्त कंपन्यांचे ग्राहक बनत आहोत; मात्र त्याचा आपल्याला काहीच फायदा मिळत नाही. भारतात १३० कोटींचे मार्केट त्यांना सहजपणे उपलब्ध झाले आहे; मात्र या सगळ्या चित्रात भारतीय केवळ बघे किंवा उपभोक्त्याच्याच भूमिकेत आहेत. मायक्रोसॉफ्ट, गुगल, फेसबुकसारख्या इंटरनेट विश्वातील बलाढ्य कंपन्या भारतीय बाजारपेठ काबीज करीत आहेत.‘लिस्ट इन इंडिया’ प्रबंधाविषयी सांगताना उमेश कुडाळकर यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अपरिहार्य जाळे आणि त्यांच्या एकाधिकारशाहीवर भाष्य केले. ते म्हणाले की, जनता सरकारने १९७८ मध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांना ६० टक्के समभाग स्थानिक गुंतवणुकीदारांसाठी खुले करण्याचे धोरण अवलंबिले होते. डॉ. विजय केळकर यांनीही विचार व्यक्त केले. विचारलेल्या प्रश्नांना डॉ. नरेंद्र जाधव आणि उमेश कुडाळकर यांनी उत्तरे दिली.वेगळ्या प्रकारचे आक्रमण सुरू...सध्या भारतावर पुलवामा सारख्या हल्ल्याबरोबरच वेगळ्या प्रकारेदेखील आक्रमण सुरू आहे. चीनच्या पेटीएम कंपनीने रिझर्व्ह बँकेकडे ‘नॉन बँक फायनान्स कंपनी’ म्हणून मान्यता मिळण्यासाठी अर्ज केला आहे.जर या कंपनीला मान्यता मिळाली, तर भारतीयांचा संपूर्ण डेटा या कंपनीकडे जाऊ शकतो. तो गेल्यानंतर भारतीयांच्या संपूर्ण माहितीचा एखाद्या शस्त्रासारखा गैरवापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नसून, त्यातून राष्ट्रीय सुरक्षेला मोठी हानी पोहोचू शकते असा सूचक इशारा दिला आहे, असे जाधव म्हणाले.