शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय पर्यटक अधिक उत्साही

By admin | Updated: March 30, 2017 02:51 IST

चीनमधील पर्यटकांपेक्षा भारतीय पर्यटक अधिक उत्साही असून २०१५-१६ वर्षात अमेरिकेला तब्बल १२ लाखांवर पर्यटकांनी

पुणे : चीनमधील पर्यटकांपेक्षा भारतीय पर्यटक अधिक उत्साही असून २०१५-१६ वर्षात अमेरिकेला तब्बल १२ लाखांवर पर्यटकांनी भेट दिली. शिक्षण, पर्यटन, व्यवसायासाठी अमेरिकेत येणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे अमेरिकेतर्फे नेहमी स्वागतच केले जाते. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेला भेट देणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे, असे मुंबई येथील अमेरिकेचे कौन्सिलेट जनरल थॉमस वाजदा यांनी बुधवारी सांगितले.पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत-अमेरिका या दोन्ही राष्ट्रांतर्फे २०१७ हे वर्ष ‘भारत-अमेरिका प्रवास व पर्यटन सहकार्य वर्ष’ म्हणून साजरे केले जात असून त्याबाबतची माहिती कौन्सिलेट जनरल थॉमस वाजदा यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘‘अमेरिकेतील नागरिकांनी पर्यटनासाठी भारतात यावे आणि भारतील नागरिकांनी अमेरिकेत यावे, या उद्देशाने २०१७ हे वर्ष प्रवास व पर्यटन सहकार्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. अमेरिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा पर्यटन सहकार्य वर्ष साजरे केले जात आहे. पर्यटनासाठी अमेरिकेत यावे, यासाठी अमेरिकन कौन्सिलतर्फे व्हिसा देण्याची प्रक्रिया अधिक जलद गतीने केली जात आहे. ‘‘पर्यटनामुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील सलोख्याचे संबंध गेल्या काही दशकांपासून द्ृढ होत गेले आहेत. अमेरिकेतील ऐतिहासिक शहरांबरोबरच, नॅशनल पार्क आदी स्थळांना पर्यटक भेटी देतात. पर्यटन हा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारा मोठा घटक आहे. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा काही प्रमाणात पर्यटकांची संख्या घटली आहे. अमेरिकेतर्फे पर्यटनासाठी अधिक प्रोत्साहन दिले जात आहे.’’पुण्याविषयी थॉमस वाजदा म्हणाले, ‘‘पुणे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असून अमेरिकेतील काही नामांकित कंपन्या पुणे परिसरात आहेत. मी पुण्यातील कोका कोला कंपनीसह एमआयटी कॉलेज आदी ठिकाणी भेट दिली. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून स्मार्ट सिटीबाबतही माहिती मिळाली.’’ (प्रतिनिधी)