शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय अधिराज्य गाजवतील

By admin | Updated: March 12, 2016 00:41 IST

भारतीयांत प्रचंड क्षमता असल्याने भारतीय नागरिक आगामी काळात जगावर बौद्धिक अधिराज्य गाजवतील. संगणक क्षेत्रात भारतीय संशोधकांनी आघाडी घेतली

पिंपरी : भारतीयांत प्रचंड क्षमता असल्याने भारतीय नागरिक आगामी काळात जगावर बौद्धिक अधिराज्य गाजवतील. संगणक क्षेत्रात भारतीय संशोधकांनी आघाडी घेतली आहे. सद्य:स्थितीत रोबोटमध्ये बौद्धिक क्षमता टाकण्याचे संशोधन होण्याची गरज आहे. यासाठी संशोधक, तंत्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी, उद्योजकांनी एकत्रित येऊन नागरिक केंद्रबिंदू ठेवून काम करण्याची वेळ आली आहे, असे मत शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व बाबूरावजी घोलप महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फंक्शनल इको फ्रेंडली स्मार्ट इमरजिंग मटेरियल्स एफ.ई.एस.ई.एम. - २०१६ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आय. आय. एस. ई. आर.चे संचालक डॉ. के. एन. गणेश, जपानचे प्रा. योशिदा हायसो, दक्षिण कोरियाचे प्रा. डॉ. सॅन वॉन रयू, प्रा. डॉ. वाय. एच. जेऊंग, अमेरिकेचे डॉ. अशोक जोशी, आॅल इंडियारबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अब्बास बुटावाला, डॉ. गोपीनाथन, डॉ. मिलिंद कुलकर्णी, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम, खजिनदार मोहन देशमुख, प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर, उपप्राचार्य डॉ. एस. डी. आघाव आदी उपस्थित होते. डॉ. के. एन. गणेश म्हणाले की, नॅनो टेक्नॉलॉजी ही काळाची गरज आहे. ऊर्जा, संवर्धन आणि संसाधन विकासातूनच स्मार्ट मटेरियल मिळवून ऊर्जेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अब्बास बुटावाला म्हणाले की, कलकत्ता येथील आॅल इंडिया रबर इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यालय पुण्यात स्थलांतरित झाल्याने पुणे आणि परिसरातील रबर उद्योगास चालना मिळेल. या अंतर्गतच बा. रा. घोलप महाविद्यालयात प्रायोगिक तत्त्वावर प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तांत्रिक, प्रशिक्षित मनुष्यबळ उभे राहील व भविष्यातपुणे रबर हब म्हणून ओळखले जाईल. डॉ. वैशाली नाईक यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस. डी. आघाव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)