शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

येणारा काळ भारताचाच !

By admin | Updated: February 28, 2017 06:51 IST

माणसाचा जगण्याचा शोध सुरू झाला आणि विज्ञानाचा जन्म झाला.

-डॉ. विजय भटकर

माणसाचा जगण्याचा शोध सुरू झाला आणि विज्ञानाचा जन्म झाला. तेव्हापासूनच माणूस संशोधक, शास्त्रज्ञ राहिलेला आहे. जगायच्या धडपडीतून त्याने दगडाची, धातूची अवजारे बनवायला सुरुवात केली. हा नवा शोधच होता. पुढे आगीचा शोध लागला... प्रत्येक दशकात आपण प्रगत होत होतोच; पण विसाव्या शतकातील वैज्ञानिक प्रगतीचा वेग हा थक्क करणारा आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण कमालीची झेप घेतलेली आहे. प्रत्येक दशकात लागलेले शोध असा जर एक आलेख मांडला, तर त्यात विसाव्या शतकात तंत्रज्ञानाचा विस्फोट झाला आहे हे लक्षात येते. त्यातून नवनवे आविष्कार जन्माला येतात. हे सारे शोध मानवी जीवनाशी एकरूप झालेले आहेत. लहानपणी गावात कार आली तरी मुलं त्याच्या मागे धावायची; आता मात्र क्षणाक्षणाला जगातील तंत्रज्ञान बदलतंय. त्याच्याशी जुळवून घेताना प्रत्यक्ष माणसाचीही दमछाक होतेय. वैद्यकीय तंत्रज्ञानात तर आपण इतकी प्रगती केलीय की तुटलेले अवयव आपण जोडू शकतो, ट्रान्सप्लांट करू शकतो, थांबलेलं हृदय सुरू करू शकतो. आता तर मानव आणि तंत्रज्ञान सोबत काम करताहेत. येणारा काळ हा तर मानवी शरीरावर तंत्रज्ञानाचा प्रभाव असेल. शरीरात विविध चिप्स बसवल्या जातील व ते माणसाचे जगणे अधिक सोपे करतील. एका अर्थाने हे तंत्रज्ञान माणसाच्या शरीरात शिरू पाहत आहे. यंत्र कोण आणि माणूस कोण अशी परिस्थिती येणाऱ्या काळात निर्माण होऊ शकेल. व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीमधून बाहेर पडून यंत्र आणि मानव हा भेदच कमी होईल की काय अशी शक्यता आता निर्माण होत आहे. (कोलंबस वाट का चुकला ?)माणसामाणसांत त्यामुळे दुरावा येतो आहे. बदलाचा वेग प्रचंड आहे. लहान मुले नवी यंत्रे चटकन आत्मसात करू शकतात, असा अनुभव आपल्याला येतो. ती शक्ती निसर्गत:च त्यांना दिलेली असते. हे बदल आपण थांबवू शकत नाही. प्रत्येक समस्या निर्माण झाली की त्याच्या निराकरणासाठी नवा शोध लावला जातो. हे चक्र अव्याहतपणे सुरू राहते. संगणकावर अतिक्रमण करणारे व्हायरस तयार झाले. त्यातून पुढे अँटीव्हायरस आले. आज म्हणूनच विज्ञानाचा खरा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर मूलभूत विज्ञानाकडे वळावे लागेल.(अवघा देश ‘विज्ञानाभिमुख’ व्हावा)येणाऱ्या भारताचे भविष्य अत्यंत उज्ज्वल आणि सकारात्मक असेल असे मला वाटते. विज्ञान-तंत्रज्ञान, संगणक, खगोलशास्त्र, आयटी, मेडिकल अशा सर्वच क्षेत्रांत जगातील अग्रगण्य अशा पहिल्या पाच देशांत आपण आहोत. ही खरोखर अभिमानाची बाब आहे. मात्र हे सारे असताना आपल्या देशाची संशोधन व विकासावर होणारी गुंतवणूक जगाच्या तुलनेत फारच अल्प आहे. एखाद्या मोठ्या कंपनीच्या गुंतवणुकीपेक्षाही ते कमी आहे. सध्या ते १ टक्क्यापेक्षाही कमी आहे. ते वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी संशोधन विद्यापीठे वाढवावी लागतील. संशोधनपूरक व प्रेरक असे वातावरण उभे करावे लागेल. सध्या चीनपेक्षा आपण मागे आहोत; परंतु आपल्याकडे लोकशाही व्यवस्था असताना आपण जो काही चमत्कार केला आहे तो खरोखर उल्लेखनीय आहे. येणारा काळ भारताचाच आहे, हे मात्र निश्चित.>महान शास्त्रज्ञांनी जग बदलणारे जे जे शोध लावले त्यामध्ये त्यांनी कधीही पैशाकडे पाहून काम केले नाही. मात्र सध्या सर्वच गोष्टी पैसाकेंद्रीत झालेल्या आहेत. संशोधन करायचे तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो. कष्ट उपसावे लागतात. केवळ फायद्याचा विचार करून चालत नाही. मुलभूत विज्ञानाचा अभ्यास त्यामुळेच सर्वार्थाने महत्त्वाचा आहे. त्यासाठी शालेय स्तरापासून इन्स्पायरसारखे उपक्रम राबवले जात आहेत. आयआयटीमध्ये मुलभूत विज्ञानावर भर दिला जात आहे. या साऱ्या सकारात्मक दिशेने होत असलेल्या गोष्टी आहेत.

(लेखक प्रख्यात संगणकतज्ज्ञ व महापरमसंगणकाचे निर्माते आहेत.)