शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा

By admin | Updated: October 29, 2014 00:25 IST

पुणो शहराच्या समस्यांबाबत त्यांचा अभ्यास असल्याने शहराच्या विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा भाजपाच्या पदाधिका:यांनी व्यक्त केली आहे.

पुणो : राज्याचे नूतन मुख्यमंत्री होणा:या देवेंद्र फडणवीस यांना   महानगरांच्या समस्यांची विशेष जाण असल्याने, तसेच विशेषत: पुणो शहराच्या समस्यांबाबत त्यांचा अभ्यास असल्याने शहराच्या विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा भाजपाच्या पदाधिका:यांनी व्यक्त केली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पुण्यात आपल्या काकांकडे व्हेकेशन बॅचच्या निमित्ताने  फडणवीस यांचे येणो-जाणो होते.  तसेच, वसंत व्याख्यानमालेसह अनेक नामांकीत व्याख्यानमालांमध्ये त्यांनी 
मांडलेले शहराचे अभ्यासपूर्ण विवेचन पाहता त्यांचा शहरासाठी स्वतंत्र कृती आराखडा राहील, असे मत या पदाधिका:यांनी व्यक्त 
केले आहे.(प्रतिनिधी)
 
देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली असल्याने शहराचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यास चांगली गती मिळणार आहे. महानगरांच्या समस्यांचा त्यांचा गाढा अभ्यास असल्याने सार्वजनिक वाहतूकव्यवस्था, मेट्रो, पीएमपीची दुरवस्था, सांडपाणी, शहराच्या उशाला चार धरणो असूनही असलेली पाणीसमस्या या सोडविण्यासाठी चांगल्या पद्धतीचे नियोजन राज्य शासनाच्या माध्यमातून केले जाईल. त्यात शहरातील सर्व आमदार भाजपाचेच असल्याने ही कामे फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वेगाने मार्गी लागतील.
- खासदार, अनिल शिरोळे, भाजप शहराध्यक्ष
 
नव्या सरकारने व्यापा:यांना दिलेले एलबीटीबाबतचे वचन पाळावे. ते पाळतील याची आम्हाला खात्री आहे. नव्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तसे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले आहे. नव्या सरकारकडून आताच अपेक्षा करणो योग्य होणार नाही. त्यांना अजून सुरुवात तर करू द्या. मात्र, नवे सरकार भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी कारभार करणारे असावे, असे आम्हाला वाटते. स्थानिक बाजाराला प्रोत्साहन द्यावे. व्यापा:यांकडून योग्य कर घ्यावा.
- फत्तेचंद रांका, अध्यक्ष, 
सराफ असोसिएशन
 
महाविद्यालयीन जीवनात 1984-85पासून व्हेकेशन बॅचेससाठी अनेकदा पुण्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना शहराच्या मूलभूत समस्यांची चांगली जाण आहे. प्रामुख्याने पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कचरासमस्या सोडविण्यासाठी त्यांनी विशेष कृती कार्यक्रम अनेकदा शहरात आपल्या भाषणांमध्ये मांडलेला आहे. त्यामुळे विकासासाठी त्यांचा स्वतंत्र आराखडा असेल. 
- श्रीपाद ढेकणो, 
पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते 
 
निवडणूक होण्यापूर्वी भाजपाने आम्हाला एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी दिलेला शब्द पाळावा. त्याबाबतचा निर्णय त्यांनी त्वरित घ्यावा. त्याबरोबरच व्यापारी, शेतकरी आणि ग्राहक यांच्यासंदर्भातील सध्याच्या कायद्यांचा फे रआढावा त्यांनी घ्यावा, अशी आमची नव्या सरकारकडून अपेक्षा आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी आणि व्यापारी या दोघांचा फायदा झाला पाहिजे. अन्न व औषधसंदर्भातील भेसळीचा नवा कायदा जाचक आहे. शॉपअॅक्ट परवाना पूर्वी दहा ते वीस रुपयांत मिळत होता, आता त्यासाठी दोन हजार रुपये खर्च होतात. वेगवेगळे कर एकत्र केले पाहिजेत. कर भरण्यासाठी व्यापा:यांचा वेळ आणि खर्च कमी होईल, याचा नव्या सरकारने विचार करावा. नव्या सरकारने जकात आणि एलबीटी दोन्ही काढून टाकावेत.
- पोपटलाल ओसवाल, अध्यक्ष, व्यापारी महासंघ