शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरच्या तोतया पत्रकाराला पोलिसांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:16 IST

चार लाखांच्या फसवणुकीप्रकणी अटक साथीदार महिला फरार बारामती : इंदापूर येथील तोतया पत्रकाराला बारामती पोलिसांनी दणका दिला आहे. ...

चार लाखांच्या

फसवणुकीप्रकणी अटक

साथीदार महिला फरार

बारामती : इंदापूर येथील तोतया पत्रकाराला बारामती पोलिसांनी दणका दिला आहे. आॅनलाईन चारचाकी खरेदी प्रकरणी उमरज (ता. कऱ्हाड) येथील व्यक्तीची ४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी या तोतया पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याची साथीदार महिला फरार झाली आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश मच्छिंद्र कदम (वय ३१, मूळ रा. काटी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद, सध्या रा. देसाईवस्ती, बेलवाडी, ता. इंदापूर) असे या पत्रकाराचे नाव आहे. त्याच्यासोबत प्रियांका पांडूरंग जाधव (रा. एमआयडीसी, बारामती) हिच्यावरही फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून ती सध्या फरार आहे. याबाबत मंगळवारी (दि.१७) बारामती शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यावेळी उपस्थित होते.

याप्रकरणी वैभव सदाशिव लाटे (रा. भवानी पेठ, उमरज, ता. क-हाड, जि. सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. ५ आॅगस्ट रोजी फिर्यादीने ओएलएक्स अ‍ॅपवर जुनी कार खरेदीसाठी जाहिरात पाहिली. त्यानुसार एक मोटार त्यांना पसंत पडली. दिलेल्या क्रमांकावर त्यांनी संपर्क केला असता महेश कदम हे त्यांच्याशी बोलले. कदम याने स्वत: पत्रकार-संपादक असल्याचे सांगितले. तुम्ही बारामतीत प्रत्यक्ष येवून मोटार पाहा असे त्याने सांगितले. त्यानुसार दि. १३ आॅगस्ट रोजी फिर्यादी हे भाऊ डॉ. विक्रांत, मित्र राजकुमार जाधव यांच्यासह बारामतीत आले. यावेळी कदम यांनी बारामती बसस्थानकासमोर त्यांची भेट घेत मोटार (एमएच१३, डीएल-७३३३) दाखवली. मोटारीतून शहरातून फेरफटका मारला. मोटारीची कागदपत्रे पाहिली असता ती प्रियंका पांडूरंग जाधव (रा. वरलेगाव, ता. दक्षिण सोलापूर) या नावे दिसून आले. ती माझी पत्नी असून तिच्या लग्नापूर्वीच्या नावावर मोटार असल्याचे त्याने सांगितले. पाच लाख रुपयांत मोटारीचा व्यवहार ठरला. त्यातील चार लाख रुपये आरटीजीएसद्वारे तर एक लाख रुपये मोटारीची एनओसी ताब्यात मिळाल्यावर देण्याचे ठरले. त्यानुसार भिगवण रस्त्यावरील स्टेट बँकेतील शाखेतून जाधव यांच्या खात्यात फिर्यादीने चार लाख रुपये पाठवले. नोटरी करण्यासाठी ते एका ठिकाणी थांबले असताना कदम हा घरी जाऊन पत्नीला घेऊन येतो असे सांगून गेला. तो परत आलाच नाही. त्याच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधल्यावरही त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने हालचाल केली. महेश कदम याला अटक केली.

फोटो ओळी : बारामती शहर पोलिसांनी चार लाखांच्या फसवणूकीप्रकरणी तोतया पत्रकाराला ताब्यात घेतले आहे.

१७०८२०२१-बारामती-१८