शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

बढतीनंतर वेतन ४ हजारांनी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:34 IST

सरकारी नियमांमुळे असे कारण देत सध्या महापालिकेतील कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांचे वेतन कमी करण्याचा प्रकार सुरू आहे.

- राजू इनामदार पुणे : सरकारी नियमांमुळे असे कारण देत सध्या महापालिकेतील कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांचे वेतन कमी करण्याचा प्रकार सुरू आहे. सहायक आयुक्त पदावरून उपायुक्त पदावर बढती मिळाल्यानंतर ४ अधिकाºयांचे वेतन दरमहा तब्बल ४ हजार २०० रुपयांनी कमी करण्यात आले आहे. महापालिका स्वायत्त संस्था असतानाही सरकारी नियमामुळे हे घडले आहे.राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर महापालिकेत येत असलेल्या अधिकाºयांना आयुक्त स्तरावरून विशेष विभाग देण्यात येतात. सामान्य प्रशासन हा त्यातीलच एक विभाग आहे. मात्र, त्यामुळे मूळ महापालिकेच्या सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांवर बढतीच्या बाबतीत अनेक वर्षे अन्याय होत आहे. आता तर सरकारी नियमांचा दाखला देत थेट वेतनावरच संक्रात आणली जात आहे.गेली काही वर्षे उपायुक्त पदाच्या बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या ४ अधिकाºयांना सामान्य प्रशासन विभागाने विविध कारणे दाखवत प्रलंबित ठेवले. वसंत पाटील, उमेश माळी, संध्या गागरे व माधव देशपांडे या अधिकाºयांना एप्रिल २०१८ मध्ये सहायक आयुक्त पदावरून उपायुक्त पदावर पदोन्नती करण्यात आली. पाटील दोन महिन्यांत निवृत्तच होत आहेत. संध्या गागरे यांचे सेवेचे फक्त सात महिने शिल्लक राहिले आहेत. माळी व देशपांडे यांनाही निवृत्तीसाठी फक्त दोन ते तीन वर्षच आहेत.निवृत्तीच्या उंबरठ्यावर त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानंतर वास्तविक त्यांच्या वेतनात वाढ होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र त्यांचे वेतन ४ हजार २०० रुपयांनी कमी करण्यात आले आहे. त्यासाठी सरकारी सेवेत उपायुक्त पदाला असलेली वेतनश्रेणीच महापालिकेतील उपायुक्त पदाला लागू केली, असे कारण सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात येत आहे. या चार अधिकाºयांशिवाय अन्य काही कर्मचाºयांनाही याच प्रकारे वेतन कमी करण्याचा धाक घालण्यात आला आहे. याच नियमाचा आधार घेत सामान्य प्रशासन विभाग काही कर्मचाºयांकडून त्यांनी सरकारी नियमापेक्षा जास्त वेतन घेतले आहे, असे सांगत त्या जादा वेतनाची वसुली करणार आहे. वेतनकपातग्रस्त अधिकारी व कर्मचाºयांनी या विरोधात संघटनांकडे दाद मागितली आहे.>वेतनश्रेणी सरकारी नियमानुसारचपदोन्नतीला विलंब का झाला किंवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना पदोन्नती का करण्यात आली, याबद्दल काही सांगता येणार नाही; पण त्यांची वेतनश्रेणी कमी झाली आहे. ती सरकारी नियमानुसारच झाली आहे. उपायुक्त या पदासाठी कोणती वेतनश्रेणी असावी हे सरकारने ठरवून दिले आहे व त्यानुसारच ते झाले आहे. यात कोणताही नियमभंग झालेला नाही.- अनिल मुळे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, महापालिका