शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाची तीव्रता वाढल्याने आठवडेबाजारावर परिणाम

By admin | Updated: April 1, 2017 01:44 IST

महिनाभरापासून वातावरणात उन्हाची तीव्रता वाढल्याने शिर्सुफळच्या आठवडेबाजारावर त्याचा परिणाम दिसून

तळेगाव दाभाडे : महिनाभरापासून वातावरणात उन्हाची तीव्रता वाढल्याने शिर्सुफळच्या आठवडेबाजारावर त्याचा परिणाम दिसून आला. भाजीपाल्याची आवक मंदावली असून, फळांच्या व शीतपेयांच्या मागणीत वाढ झाली आहे.मावळ तालुक्यातील मध्यवर्ती असलेले हे गाव आहे आजूबाजूच्या गावांतील भागातील विक्रेते व खरेदीदार तळेगाव येथे आठवडेबाजारात येत असतात. आठवडेबाजारात उन्हाच्या तीव्रतेने भाजीपाल्यांची आवक मंदावली आहे. परिणामी, दरामध्ये वाढ झाली आहे. तसेच, उन्हाचा चटका लागत असल्याने ग्राहकांनी उशिरा बाजारात येणे पसंत केले आहे. याचा परिणाम आठवडेबाजारावर दिसून आला.उन्हामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. याचा परिणाम आमच्या धंद्यावर झाला असल्याचे अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले. तसेच फळविक्रेत्यांनीसुद्धा फळांना मागणीच्या दृष्टीने दर मिळत नसल्याचे सांगितले.तळेगाव परिसरात उन्हाच्या तीव्रतेने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला हैराण झाल्या आहेत. उन्हाचा आरोग्यावर परिणाम जाणवू लागल्याचे चित्र आहे. दुपारपर्यंत उष्णतेचे वातावरण असल्याने शेतातील कामावर याचा परिणाम दिसून येत आहे. दैनंदिन कामकाजावर याचा परिणाम झाला आहे. (वार्ताहर)