शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

राष्ट्रकारणाचे वाढते महत्त्व धोक्याचे

By admin | Updated: January 24, 2017 02:20 IST

छत्रपती शिवाजीमहाराजांनी आयुष्यभर राष्ट्रकारण केले. आज त्यांचेच नाव घेणारे राष्ट्रवादात दंग झालेले दिसत आहेत. आज राजांची

पुणे : छत्रपती शिवाजीमहाराजांनी आयुष्यभर राष्ट्रकारण केले. आज त्यांचेच नाव घेणारे राष्ट्रवादात दंग झालेले दिसत आहेत. आज राजांची शिकवण तर सोडाच; परंतु राष्ट्रवादापुढे राष्ट्रकारणालादेखील महत्त्व न देणारे राजकारणी सभोवताली दिसतात, याची खंत वाटते, असे मत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी व्यक्त केले. श्री आदिशक्ती फाउंडेशनतर्फे आऊसाहेब पुरस्काराचे ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांच्या हस्ते वितरण करण्यात आले, त्या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यंदा आऊसाहेब पुरस्काराने शांताबाई नवलखा, लक्ष्मीबाई साळुंके, विमल बऱ्हाटे, जनाबाई आसबे, शांता वाके आणि ताराबाई कांबळे यांना सन्मानित करण्यात आले. शिवदास निनाद पुरस्काराने यंदा मुंबईतील दादर येथील अप्पासाहेब परब यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी महापौर प्रशांत जगताप, ज्योतिषशास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र सहस्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते.परांजपे म्हणाले, ‘‘आदिशक्ती या शब्दात मोठा इतिहास दडलेला आहे. तो लिखित स्वरूपात नाही. भारतीयांची सर्जनशील शक्ती म्हणजे आदिशक्ती होय. इ.स.पूर्व १३ हजार वर्षांहून अधिक पूर्वी मातीचा कलश, घट निर्माण केला गेला. त्याच्यामागचे मूळ चिंतन म्हणजे कोणत्याही पोकळीला आकार दिला, की घट अर्थात अवकाश तयार होते. महाराजांनी असेच राष्ट्रअवकाश घडविले. महाराष्ट्राच्या भूमीला सुपीक आणि सर्जनशील बनवले. महाराजांनी सर्जनशीलता, रसिकता आणि सभ्यता हे त्या अवकाशाची खांब असल्याचे वेळीच जाणले होते. या खांबाची खरी बेरीज म्हणजे खरा धर्म होय. अशा धर्माला प्रचार-प्रसाराची आवश्यकता नसते. या वेळी पुरस्कार्थींच्या वतीने त्यांच्या परिवारातील सदस्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. अप्पासाहेब परब यांच्या मनोगताने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. प्रशांत जगताप यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे राजमिथुन अंबिराज, सूर्यकांत कडू, निनाद नाईक, अभिषेक तिवारी, प्रथमेश केसकर, वैभव जोशी, सत्यम शुक्ला, प्रकाश झा आदी सभासदांनी विशेष प्रयत्न केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. तेजस लडकत यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)